पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ३५. ५८३ होय. तो आपल्या विकल्पानेंच, आपल्या बंधाकरितां, कोशकार कृमीप्रमाणे, जाळे पसरतो. एक देहभ्रम सोडून दुसऱ्या देशी व दुसऱ्या काळी तो दुसरे शरीर धारण करतो. एके ठिकाणचा अकुर दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावला असता त्याला जशी तेथें नवीं पाने येतात त्याचप्रमाणे जीवाची अवस्था होते. वासनेप्रमाणे मन होते. मोठ्या शुभ वासनेने ते मोठे होते. इंद्रपदाविषयी मनोराज्य केले असता नर योग्यसमयीं इद्रपदास प्राप्त होतो. त्याचप्रमाणे क्षुद्र वासनेच्या योगाने चित्त क्षुद्र होते. पिशाचाविषयी मनो- रथ केला असता पुरुष रात्री स्वप्नात भुतें पहातो. सरोवराच्या अति निर्मल जलामध्ये मळ फार वेळ टिकत नाही आणि अति मलिन जलामध्ये निर्मलता फारशी टिकत नाही, हे प्रसिद्धच आहे. त्याचप्रमाणे कलुषित मनामध्ये तसलेच फळ निपजतें व शुद्ध मनामध्ये शुद्ध फल उत्पन्न होतें, चंद्र अमावास्येच्या दिवशी जरी अगदी क्षीण झाला तरी तो 'मी पूर्ण होईन' ही आशा जशी सोडीत नाही त्याप्रमाणे उदार पुरुष राष्ट्रीय आपत्ती- मुळे जरी संकटात पडून चित्तसमाधानरहित झाला तरी तो उद्यमशील महात्मा आपली उदार गति सोडीत नाही. तो चित्तसमाधानाकरिता पुनः दीर्घ प्रयत्न करतो. अथवा कितीही जरी बाह्य संकटे आली तरी बंध. मोक्ष, सुख, दुःख इत्यादिकातील काहींच सत्य नसल्यामुळे तो त्याची तितिक्षा करतो. सर्वत्र एक ब्रह्मसत्ता पसरली आहे, हा निःसार ससार असन्मय स्फुरण पावत आहे. असें महात्मे निश्चयाने जाणत असतात. मी मर्यादित व दीन, दुर्बळ आहे ही त्याची भावना मी अनत व ईश्वर आहे या भावनेने पार नाहीशी झालेली असते. सर्वगामी स्वन्छ स्वात्म्यामध्ये 'हा मी, अशी सकुचित भावना करणे हेच सकल्पजन्य बधन होय. बंधमोक्ष दशाहीन व द्वित्व-एकत्वरहित अशी ही सर्व ब्रह्मसत्ता आहे. अति निर्म- लतेमुळे ज्याचे मरण समीप आले आहे, असें कोठे सक्त न होणारे मन ममन होऊन याच शरीरात ब्रह्म पहाते. 'चित्तशातीच्या अभ्यासरूपी जलाने निर्मल झालेले मन ब्राह्मी दृष्टी धारण करते. सर्वच माझा मात्मा आहे, या भावनेने ग्राह्य व त्याज्य ह्या भावाचे बल क्षीण झालें असतां बंध व मोक्ष-कल्पनाही सोडावी. हे जग आत्माच आहे या भावावाचून जगच्छी कधीही सुखकर होत नाही. जल निराळे व