पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८२ बृहद्योगवासिष्ठसार. मनाचा नाशच सर्व-अनर्थ-निवृत्तिरूप व निरतिशय आनंदाभिव्यंजक असल्यामुळे खरा अभ्युदय आहे. ब्रह्म व आत्मा यांचे ऐक्यज्ञान ज्याला झालेले असते त्याचे मन शांत होते व अज्ञाचे मन वाढते. पण पुष्कळ खत घातल्यामुळे जोराने फोफावणान्या शेताप्रमाणे अज्ञानादि दोषामुळे मनाची भयंकर वाढ होऊ लागली असता अनर्थ ओढवतात. कारण जग- चक्र मनोमात्र आहे. मनच पर्वतसमूह आहे. मनच आकाश, मनच देव, मनच मित्र व मनच शत्रु आहे. विकल्पाच्या योगानें कलुषित झालेली जी चित्-तत्त्वाची विस्मृति तेच मन होय. आत्म्याच्या विस्मरणामुळे उद्भव- णाऱ्या नाना विकल्पवासना हेच मनाचे त्याज्य रूप आहे. (आतां असल्या मनाच्या योगाने बद्ध होणारा जीव कोण, ते सागतों) मनामध्यें वासनारूपाने विषयांचा प्रवेश झाला असता त्याच्या योगाने परिच्छिन्न झालेल्या चिन्मात्रात स्थित असे जे विकल्पवासना-कलुपित ब्रह्म तोच जीव होय. जीव व मन यामध्ये फारच थोडे अंतर आहे. विषयाभिमुख होऊन, दृढ अभ्यासामुळे, तो विषयच मी आहे, असे वाटणे व त्याच अज्ञानामुळे आत्मस्वरूपाला विसरणे हे जीवाचे रूप व तेच जेव्हा हजारों संकल्प करून मोह पावते, सारभूत स्वस्वभावापासून दूर जाते व बाह्य पदार्थीशी संबद्ध होते तेव्हा जीवाचें उपकरण मन होते. एकाच भात्मस्व- रूपाच्या विस्मरणाला निरनिराळ्या अवस्थेत दोन सज्ञा प्राप्त झाल्या आहेत. ते जेव्हा अहं अशा अभिमानाने युक्त असते तेव्हा जीव व जेव्हा त्याचें सकल्पद्वारा उपकरण होते तेव्हा मन होय. आता जीव व त्याची उपाधि मन याहून अगदी विलक्षण असलेलें शुद्ध आत्मस्वरूप कसे असते ते सागतो. आत्मा ससारी पुरुप ( म. जीवस्वभाव ) नव्हे, शरीर नव्हे व त्यातील रक्तादि नव्हे. कारण शरीरादि सर्व जड आहे आणि देही (देहस्वामी आत्मा) आकाशाप्रमाणे निलेप आहे. आता शरीर जडच आहे हे कशावरून म्हणून विचारशील तर सांगतों-शरीराचे लहान लहान तुकडे जरी केले तरी त्यात रक्त, मांस, अस्थि यांवाचून दुसरे कांही आढळत नाही. केळीचा खाब सोलला असता त्यांत जसे पाना ( सौंपटा)वाचून दुसरे काही नसते, तसेच शरीरांत सप्त धातू- वाचून काही नसते, ते तर प्रत्यक्ष जड आहेत. यास्तव त्याच्या योगार्ने बनलेले शरीर जडच असणार हे उघड होय. साकार मनच नर