पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्म ३४. ५७९ हैं मसत् शरीर मुळीं नाहींच. शुद्ध चित्त आपल्या स्वरूपामध्ये स्थित आहे भाणि त्यामुळे अह म्हणून कोणी नाही; अशा दृढ निश्चयानेच ते सदा व्यवहार करीत. असो; अनेक वर्षे युद्ध केल्यावर त्या निरहंकार, जरा- मरणाविषयी निर्भय, प्राप्त होईल तेवढेच करणाऱ्या, प्रसंग पडेल तसे वागणा-या, कोठेही सक्त न होणान्या, शत्रूस मारूनही अहंकार न करणान्या, वासनाजाळ्यातून मुक्त झालेल्या, प्रभूचे हे कार्य अवश्य केले पाहिजे एवढेच समजणाऱ्या, राग-द्वेपशून्य व समदृष्टी दानवांनी देवसेनेचा विध्वस करून सोडला. भीम, भास व दृढ या शूर दैत्यानी तिला तुडवून सोडले. तेव्हा ती दीन झालेली देवसेना हिमालया- वरून निघालेल्या गगेप्रमाणे वाट फुटेल तिकडे पळून गेली. इंद्रादि देव क्षीरसागरस्थ भगवानाला शरण गेले. तेव्हा लोकनाथ हरीने त्यांचे सात्वन करून युद्धाची तयारी केली. शौरी व शबर याचे घोर युद्ध झाले. त्यात तो मायावी दैत्य महा मायावी विष्णूच्या हातून मरण पावला आणि त्याच्याच स्वरूपात लीन झाला. ज्ञानी भीमादिकानाही त्या लक्ष्मीशाने आपल्या स्वरूपात मिळवून सोडले. ते वासनाशून्य असल्या कारणानें, वि. झलेल्या दिव्याप्रमाणे त्याची गति कोणालाही कळली नाही. तस्मात् राम- भद्रा, मन वासनेने बद्ध होते आणि तेच वासनाशून्य झाले असता मुक्त होते. यास्तव तूही विवेकतः निर्वासनी-भाव सपादन कर. सत्य वस्तवें यथार्थ ज्ञान झाले असता वासना क्षीण होते. वासनाक्षय झाला म्हणजे मन नाश पावते. हा सत्य चिदात्मा ज्या दृश्याची भावना करितो त्यांतील काहीही सत्य नाही. त्यामुळे दृश्यभावना (दृश्यदर्शन) ही मिथ्या आहे, असे जाणून बाकी रहाणान्या स्वप्रकाश चिन्मात्राचे दर्शन घेणे, त्याचे वारं- बार स्मरण करणे व त्याच्याकडे सतत अनुसधान ठेवणे हेच सत्य वस्तूचें यथार्थ ज्ञान आहे. आत्माच हे सर्व आहे. तेव्हा कोण, कोठे, कशाची भावना करणार ! फार काय पण दृश्याची वासनाही नाही, असे समजणे ह यथार्थ ज्ञान होय. वासना व चित्त हे दोन शब्द त्याच्या अधीसह जेय लीन झेतात ते परम पद होय. वासनायुक्त चित्त हीच जगस्थिति व पासनारहित्य हीच मुक्ति. अनेक विषयाच्या आकाराने चित्ताची स्थिति खाली माहे. यास्तव त्याला विषयाकार न होऊ देतां शांत करावें.