पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५७८ बृहद्योगवासिष्ठसार. करशील. देह मी नव्हे व त्याचे काही नाही असे समजून आणि हे सर्व माझें आहे व मीच हे सर्व आहे अशी भावना करून पूष्य संवित् चित्तात स्थिर करावी. म्हणजे अनायासाने परम पद प्राप्ति होते ३५. __ सर्ग ३४-भीमादि दैत्यांच्या हातून पराभूत झालेल्या देवांनी हरीची प्रार्थना केली; त्याने शंबरासुराला मारलें व वासनारहित भीमादिकही मुक्त झाले. श्रीवसिष्ठ-रामा, दामादि सेनापती पळून गेल्यावर शंबरासुराच्या पर्वततुल्य नगरात काय झाले ते सांगतों ऐक. देवाच्या हातून पराभव पाव- लेल्या दैत्यसेनेचा वर सागितल्याप्रमाणे विधस झाला असता शंबरासुर काही दिवस स्वस्थ राहिला व नंतर पुनः देवाच्या वधास उद्युक्त झालेल्या त्याने असा विचार केला- मी आपल्या मायेनें दामादिकास निर्माण केले होते. पण त्या मूर्ख असुरानी मिथ्या अहंकाराच्या अधीन होऊन सर्वस्वाच, नाश केला. यास्तव आता मी दुसन्या अध्यात्मशास्त्रज्ञ व विवेकी दैत्यास मायनेंच उत्पन्न करतो. म्हणजे तत्वज्ञानाने युक्त असलेले ते मिथ्या भावनेचा त्याग करतील. त्यामुळे त्याना अहकार पिशाचाची बाधा होणार नाही आणि ते देवानाही जिंकू शकतील-असा विचार करून शंबराने मायेनें समुद्रातील तरगाप्रमाणे तसलेच दानव उत्पन्न केले. ते सर्वज्ञ, आत्मतत्त्वज्ञ, विरक्त, निष्पाप, प्राप्त होईल तेवढेच कृत्य करणारे व त्यामुळे सर्वोत्तम होते. शंबराने भीम, भास व दृढ अशी त्याची नावे ठेविली. वायु भक्षण करणारे ते सर्व त्रिभुवनाला तणाप्रमाणे लेखित होते. (पोटाची चिंता नसल्यामुळे ते इतके निःस्पृह झाले यात काही फारसें नवल नाही.) ते तिघेही वीर शबराच्या आवेन भूमीवर आले व त्यांनी अतरिक्षास आच्छादित करून सोडून पावसाळ्यातील मेघांप्रमाणे भयंकर गर्जना करण्यास आरंभ केला. तेव्हां देवही त्यांच्याशी युद्ध करावयास आले. उभय पक्षाचे रोमहर्षण युद्ध पुष्कळ वर्षे होत राहिले. पण भीमादिदैत्य विज्ञानी असल्यामुळे अहं- कारवश झाले नाहीत. कारण हे माझें' इतकी वासना जा त्यांच्या मनांत येत आहे तोच 'मी कोण?' हा विचार उत्पन्न होऊन तत्काळ ती (वासना) असत्य ठरत होती. भामची शरीरें व हे देवही जर असत माहेत तर आम्ही भ्यावें कोणाला व कां : शिवाय मी कोण ! हा विचार त्यांच्या चित्तांत सतत जागत असल्यामळे भयाचा उदयच झाला नाही.