पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ३३. ५७७ अभिमान तोच लौकिक व तुच्छ तिसरा अभिमान होय. या दुरात्म्याला वर्जच केले पाहिजे. तो महाशत्रु आहे. हा चांडाळ ज्याला जर्जर करून सोडतो त्याचा पारमार्थिक अभ्युदय कधीही होत नाही. हा निर्दय शत्रु नानाप्रकारच्या मानस व्यथा देतो. याच्या योगानें कष्टी झालेले लोक संकटांत पडतात. यास्तव, बा सजना, या दुष्ट अहभावाचा त्याग करून पहिल्या अहंभावाचा अगीकार करावा. म्हणजे ईश्वर स्वतः अंतःकरणात प्रकट होतो. मी देह नव्हे, असा निर्णय करून त्या लौकिक अहकाराचा त्याग व अलौकिक शास्त्रीय अहकाराचे ग्रहण करणे हे सर्व महात्म्याना मान्य आहे. दामादिकाना या भयकर लोकिक अभिमानामुळेच असह्य दुःखांत पडावे लागले. श्रीराम-गुरुवर्य, या तिसऱ्या अहंकृतीला चित्तातून पार धुवून टाकल्याने पुरुषाला कोणता हितकर भाव प्राप्त होतो ? श्रीवसिप्र-रामा, अगोदर काही विचार न करिता तिचा त्याग करावा. "म्हणजे ती जशी जशी कमी होऊ लागते तसा तसा साधक पर-पदापाशी जातो. त्याचे स्वरूपसुख वाढते आणि शुभ अहकाराची भावना करूं लागल्याने तो थोडक्याच अवकाशात परम पदी आरूढ होतो. पढे त्या धन्य पुरुषाने शुभ अहकाराचाही त्याग करून निरहकार-स्थितीत काल घालवावा. म्हणजे सर्वोत्तम पदप्राप्ति होते. 'हितवचन शभरदा सांगावे; पण अहितवचन एकदाही सागू नये,' असा न्याय असल्यामुळे रामा, मी पुनः एकदा सागतों की, परमानदाचा साक्षात्कार व्हावा म्हणून सदा सर्व प्रयत्नाने ही लौकिक दुरकृति सोड. कारण तो एक शरीरातील असाध्य रोग आहे. त्याला वर्ज करणे हेच परम श्रेय व परम पद आहे.. विचाराने या स्थूल लौकिक अहंकाराचा त्याग केल्यावर साधक कोणताही जरी व्यवहार करीत असला तरी अधोगतीस जात नाही. ज्याचा अहंकार शांत झाला आहे अशा अतितृप्त पुरुषाचे भोग- रूपी रोग वाढत नाहीत. पुरुषाने विषयोपभोगाचा स्वाद सोडला म्हणजे साधकाचे श्रेय त्याच्यापुढे चालून येते. अहंकार हा आत्मग्रहण न करता अनात्मग्रहण करविणारा मनाचा नेत्र आहे. पण तोच साधकाच्या प्रयत्नानें फुटला म्हणने मग आत्म्यावाचून त्याला दुसऱ्या कोणाचा आधार रहाणार ! राषषा, भगीरथ प्रयत्नाने अहंकार सोड. म्हणजे तूं भवसागराचे उल्लंघन ३७