पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ बृहद्योगवासिष्ठसार. मत्तपिशाचिका धावत असतात. ज्या नराधमाला अहंकार पिशाचाने पछाडलें आहे त्याला शास्त्रे, मत्र, तत्र इत्यादि काही लाम देत नाहीत. श्रीराम-भगवन् , कोणत्या उपायाने अहकाराची वृद्धि होत नाही, ते मला संसारभयशात्यर्थ सागा. श्रीवसिष्ठ-पूर्वोक्त आत्मस्वभावाचे सदा स्मरण करू लागले असता चित् जशीच्या तशी निर्मल रहाते आणि त्यामुळे अहकाराची वृद्धि खुंटते. ही जगद्रपी इद्रजालश्री मिथ्या आहे. तेव्हा त्यातील पदार्थाविषयी राग- द्वेष करून काय करावयाचे आहे ? असा मनांत विचार करू लागले म्हणजे अहकार लीन होतो. ज्या पुरुषाला आपल्याविषयी अहभाव नसतो आणि दृश्यशोभेविषयी आसक्ति नमते तो शात व्यवहार करू लागला तरी त्याचा अहंकार वाढत नाही. हा आत असलेला मी व हे बाहेर असलेले जग या-त्याज्य व ग्राह्य व्यवहारास निमित्त होणा-या-दोन्ही दृष्टीचा क्षय झाला असता व समभाव वाढला असता अहंभावही उत्तरोत्तर क्षीण होऊ लागतो. मी द्रष्टा, हे चित्त दर्शन (ज्ञानसाधन ) व हे जग दृश्य ही त्रिपुटी आणि त्यातही हे शत्रुरूप असल्यामुळे त्याज्य व हे मित्ररूप अस- ल्यामुळे ग्राह्य या भावाचा क्षय होऊन सर्वात्मतारूप समता रूढ झाली असता अहभाव दुर्बल बनतो. श्रीराम-प्रभो, अहंकाराची आकृति की काय आहे ? त्याचा त्याग कसा करता येतो? तो सशरीर आहे की अशरीर ? आणि त्याचा त्याग केल्यान कोणता लाभ होता ? श्रीवसिष्ठ-राघवा, या जगात त्रिविध अहकार आहे. त्यातील दोन प्रकारचा अहकार श्रेष्ठ असून तिसरा त्याज्य आहे. 'मी हे सर्व विश्व आहे. मी अच्युत परमामा आहे. मजवाचून या जगात दुसरे काही नाही.' हा अहंकार श्रेष्ट आहे. हा मोक्षास कारण होणारा अहकार तिस-या प्रकरणात (सर्ग ११८ पृष्ट ४७९) सागितलेल्या चव या व पाचव्या भूमिकेतील जीवन्मुक्ताचे ठायीं असतो. तो बध मुळीच उत्पन्न करीत नाही. मी साइन निराळा व अतिसूक्ष्म आहे अशा प्रकारचा जो अहकार तो दुसरा शुभ अहकार आहे. सहाव्या भूमिकेंतील जीवन्मुक्ताचे ठायी असणार। तोही बंधाला कारण होत नाही. हात, पाय, कान, पोट, इत्यादि अवय वांनी युक्त असलेला हा देहच मी आहे, अशा प्रकारचा जो मिथ्य