पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग १३. अथवा उन्मेष असून ) त्याचा ताचिक अर्थ जाणणे हेच परमार्थाकाशाचें नैर्मल्य आहे. तोच मोक्ष होय. अहंभावाला तत्वतः जाणलें म्हणजे तोच नाहंभाव होतो. कारण अहं ही शुद्ध कल्पना आहे, तो चिद्विलास आहे, असे कळलें म्हणजे जल जलांशी जसे मिळून जाते त्याप्रमाणे तो (अहंभाव ) चिदाकाशाशी एकरूप होतो. अहं हे दृश्याचे बीज आहे. यास्तव तेच कारणांत लीन झाले म्हणजे दृश्यांकुर कंसा उद्भवणार ? एवढ्या- साठीच 'दृश्य वस्तुतः नाही.' असे आम्ही म्हणतो. अहं हा काय पदार्थ आहे असा शास्त्र व संतवचन यांच्या साह्याने विचार केला म्हणजे त्याचे तत्व कळणे अगदी साहजिक आहे आणि ते कळले म्हणजे एकटें चिदा- काश रहाते, पिशाचाचा वस्तुतः अभाव असतानाही ते आहे असा संशय आल्यास प्रौढबुद्धिपुरुषांनाही मोठे क्लेश होतात आणि त्यांनाही जर त्याची बाधा होते तर मग ज्याची बुद्धिच अपरिपक आहे अशा बाळ काविषयी काय सागावें ? चिचंद्रिका जोवर अहंकारमेघानी आच्छादित झालेली असते नोवर ती परमार्थकुमुद्वतीला विकसित करीत नाही. अहं अशा या अभिमानाचा नाश झाला असतां नरक, स्वर्ग, मोक्ष इत्यादिकाविषयींची इच्छाही पार नाहीशी होते. हृदयामध्ये अहंकार-मेघ जोपर्यंत स्थिर असतो तोपर्यंत तष्णारूपी कुड्याची मंजिरी विकास पावते. अहंकाररूपी ढग चेतनेचे भाक्रमण करून राहिला असता अधकारच पसरतो. प्रकाश मुळीच नाही. हा भसत्-अहंकार स्वतः मिथ्याकल्पित जरी असला तरी तो दुःखाला कारण होतो. हर्षाला नव्हे. व्यर्थ कल्पिलेला हा अभिमान अनंत संसार देणा-या मोहात पाडतो. ' हा देहच मी' या दुर्मतीसारखी अनर्थभूत मति या संसारांत दुसरी कोणतीही नाही. सर्व दुःखें अहकारामुळे होतात. ज्याने अहंकाररूपी महा विषवृक्षाचा अंकुर विचारपूर्वक समूळ उपटून टाकला आहे त्याच्या हृदयात ज्ञानतृण जोराने वाढते. कारण अहभाव हाच अक्षय जन्मवृक्षांचा अंकुर असून हे माहें या त्याच्या सहस्रावधि शाखा आहेत. परंतु तो वक्ष आणि त्याच्या शाखा जणु काय कावळ्याच्या उडीनेही कोसळून पडण्यासारख्या निर्बल असतात. कारण त्यांना उलथून पाडा- वयाचे झाल्यास ज्ञानावाचून दुसरे कोणतेच साधन लागत नाही. अहंभा- वनाच आत्म्याला संसारचक्रात पाडणारी माहे. जन्मरूपी भरण्यामध्ये जोवर महंभावरूपी अंधकार पसरलेला असतो तोवरच त्यात या चिंतारूपी