पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. ६७४ माता असल्या त्या, साक्षात् फल देणान्या प्रशमाचा उपाय कोणता म्हणन विचारशील तर पुनः सांगतों-अभिमानाचा परित्याग करावा आणि विषयाच्या दोषाचे वारवार स्मरण करून विषयाभिलाष कमी कमी करीत जावें. चित्-, निश्चल कैवल्य व आपला मोक्षयोग्य श्रेष्ठ (मानुष) कम यांचा विचार करावा आणि सज्जनांच्या चरणाचे सेवन करावे. कारण सज्जनसमागमावाचून चित्तशुद्धीकरितां केलेली त, तीर्थाटन, व शास्त्राध्ययन संसारसागरांतून सोडविण्यास समर्थ होत नाहीत. सज्जन कोणाला म्हणावें तेंही तेथें सागून ठेवतो. ज्याचा लोभ, मोह व क्रोध है दोष प्रत्यही क्षीण होत असतात व जो आपल्या कर्मामध्ये यधाशास्त्र निमग्न असतो तो सज्जन होय, असें जाणून त्याचा समागम करावा. कारण अशा पुरुषाच्या समागमाने एकादे वेळी अकस्मात् आत्मवेत्याचा संगही घडतो व त्यामुळे या दृश्याचा अत्यंताभाव कसा आहे, ते कळतें. म्हणजेच ज्ञानलाभ होतो. दृश्याचा अत्यत-अभाव झाला म्हणजे परब्रह्मच अवशिष्ट रहाते व त्यावाचून दुसरा आधारच नाहीसा झाल्याकारणाने जीव त्यातच लीन होतो. दृश्य कधी उत्पन्न झाले नाही, होत नाही व होणार नाही. वर्तमानसमयी त्याचे अस्तित्वही नाही. तर त्रिकाळी निराबाध ब्रह्मच आहे. रामभद्रा, उत्पत्तिप्रकरणांत अनेकयुक्तींनी दृश्याचा असंभव कसा आहे ते दाखविलेंच आहे व त्याच्याच दृढतेकरिता येथेही दाखवं. पण आता अगोदर सर्व विद्वानानी जसा अनुभव घेतला आहे तसेच हे निर्मल व शात त्रिजगत्संविदाकाश तुला दाखवितो. हैं संविदाकाश तत्त्व आहे; परमार्थरूप आहे. तेव्हां त्याच्यामध्ये अतत्त्व म्हणजे माया व तिचे आकाशादि कार्य कसे असणार ? परमार्थ व अपरमार्थ याचा तात्त्विक सहवास होणे अशक्य आहे. तर मग जगत् हे काय आहे ? पाण्यावरील बुडबुडा. त्रिभुवनात जो जो अनुभव येतो तो तो सर्व ब्रह्मचिदादित्याच्या किरणरूप आहे. म्हणजे त्याहून निराळा नव्हे. कारण किरणवान् पदार्थ व किरण यांमध्ये भेद तो कोणता? या चित्- दृष्टीचे स्वभावतः होणारे उन्मेष-निमेष ( उघड-झांप, विकास-सकोच ) हेच जगद्रूप अनुभवाचे उदयास्त होत. अहं (मी) याचा खरा अर्थ न जाणणे हाच परमार्थाकाशातील मळ असून (म्हणजे तीच अविद्या