पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५७२ बृहद्योगवासिष्ठसार. केवल तर्कमय व त्यामुळेच निराधार असते. यास्तव बा रामा, त्यांच्या उप- देशाची आपल्याला मुळीच गरज नाही. असो; परिणामी दौर्भाग्य देणारी, कृपण करणारी व शुभहीन अशी ही अविचारणारूपी गाढ व दीर्घ महा निद्रा, टाकून जागे व्हावे. डबक्यातील म्हातान्या कासवाप्रमाणे सदा निजूनच राहू नये. जरा व मरण याच्या शातीकरिता उत्थानाचा अगी- कार करावा. द्रव्यसंचय अनर्थात पाडतो. भोगसमूह भवरोग उत्पन्न करितो. इतर सर्व सपत्ती या आपत्तीच आहेत आणि या सर्वाचा अना- दर करणे हा जय होय, लोकव्यवहाराच्या विरुद्ध नसलेल्या शास्त्राचा- रांचे अनुसरण करून त्यांचे शुभ फल मिळविण्यास सज्ज व्हावे. कारण, हे सजना, आचाराच्या योगाने ज्याचें चरित्र रम्य झाले आहे, ज्याची बुद्धि विवेकसपन्न झाली आहे व जो सामारिक सुखादिकाविषयी निरिच्छ आहे, अशा पुरुषाचे आयुष्य, यश व गुण लक्ष्मीसह, वसत-ऋतूतील वेलींप्रमाणे, मत्फलाकरितां, प्रफुहित होतात ३२. सर्ग ३३-शुभ उद्योग, मायु व सच्छास्त्र याचे वैभव, अहंकारामुळे. बंध व त्याच्या त्यागाने मुक्ति श्रीवसिप्र-सर्व तीत्र साधनाचे फळ अवश्य मिळते असा नियम असल्यामळे व शेतातील कष्ट, सेवा इत्यादि लौकिक व वैराग्य, विचार, अभ्यास इत्यादि शास्त्रीय साधनाचे फल सदा प्रत्यक्ष मिळत असल्याचा अनभवही येत असल्याकारणाने रामा, नही शुभ उद्योग सोडू नकोस, शास्त्रीय सभोद्योगाला असाध्य असे काही नाही याविषयी मी आता तुला एक आख्याधिका सागतो-पूर्वी शीलाद ह्मणून एक मनि होता. आपल्याला मर्वज्ञ पुत्र व्हावा या इन्छेने त्याने तप करन भगवान् रुद्राला सतुष्ट केले. दीर्घ तपाच्या योगानें प्रसन्न झालेला ईश्वर, त्याला इष्ट वर द्यावयास मिद्ध झाला असता, म्हणाला "माझ्या वाचून दुसरा कोणी सर्वज्ञ असणे सभवत नाही, यास्तव मीच अशाने तुझा पुत्र होईन. पण तो तुझा पुत्र सोळा वर्षाचा होताच मरण पावेल." ते ऐकून त्याच्या इच्छेविरुद्ध तांडा- तृन ब्र काढण्याचेही सामर्थ्य न झाल्यामुळे शिलादाने त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याच्या ह्मणण्याला मकाव्याने अनुमोदन दिले. काही दिव- सानी त्याला नदी या नावाचा पुत्र झाला. पण लहान असतानाच त्याने बापाच्या तोंडून सोळाव्या वर्षी आपला मृत्यु आहे असें ऐकून तपाच्या