पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग १२. करूं नये. चिरकाल परिपक्क झालेल्या सिद्धीचे फळही पुष्ट मिळते. यास्तव शोक, भय, आयास, गर्व ष गडबड न करितां यथाशास्त्र व्यवहार करावा. आपलाच विनाश करून घेऊ नये. जीर्ग अंधकूपासारख्या स संसारांत पडून जीव जणुं काय मेला आहे. इंद्रियरूपी दोन्यांचा जणुं काय त्याच्या गळ्याभोवती फांस लागला आहे. यास्तव वीरा भोगांची आस्था सोड, म्हणजे तूं उत्तरोत्तर खाली घसरणार नाहीस. या शास्त्राचा चांगला विचार कर. कारण तें मृत्यु, जरा इत्यादि अनेक आपत्तींचें निवारण करणारे अमोघ अस्त्र आहे. या घाणेरड्या चिखलासारख्या संसारात जिवंत राहण्याची आशा करूं नये. भोगवासना हृदयांतून घालवावी. भोगांची वासनाही गेल्यावर त्या ( भोगा ) करितां अवश्य लागणाऱ्या द्रव्यलेशाची गरज रहाणार नाही. तस्मात्, हे सर्वश्रेष्ठ पुरु- षानो, सर्वस्वाचा त्याग करून मोक्षशास्त्राचेच अवलोकन करा. विषया- कार चित्तवृत्तींमध्ये प्रतिबिंबित झालेल्या चिदाभासाचे बिंब अतःकरणाने मर्यादित झालेले चैतन्य आहे व अतःकरणोपहित चिदाभासाचे बिंब शुद्ध. ब्रह्मचैतन्य आहे. प्रतिबिंबे व त्याच्या दोन्ही उपाधी असत्य आहेत आणि बिब सत्य आहे. पण अतःकरण ही उपाधि जरी असत्य असली तरी तिच्या योगाने मर्यादित झालेले बिंब-चैतन्य व त्यांत नियमाने रहाणान्या चिदाभासाचे बिबभृत ब्रह्मचैतन्य याचा भेद मिथ्या आहे. त्यामुळे उपा- धीचा निरोध केल्यावर अखड, सत्य, प्रत्यगभिन्न ब्रह्मचैतन्यच भवशिष्ट रहाते. म्हणून तोच परमार्थ आहे; असा विचार करावा. श्रीराम-पण गुरुवर्य, सांख्य, पातजल, गौतम, कणाद, बुद्ध, जैन इत्यादि दुसरे लोक ही प्रतिबिंब प्रक्रिया मानीत नाहीत. ते निराळ्याच रीतीनें तत्त्वोपदेश कारतात. तेव्हा त्याच्या सांगण्याप्रमाणे चालावे की नाही ? श्रीवासष्ठ-प्रिय शिष्या, आपल्या या शास्त्रांत नसेल तर त्याच्या पासूनही उत्तम साधनाचा उपदेश घ्यावा. नाही असें नाही. पण या शास्त्रांत नाही असे ते कांहींच सागत नाहीत. उलट या आमच्या अध्यात्म-वियेंत तत्त्वनिरीक्षण अगदी सक्ष्म व अगदी न्याय्य दृष्टीने केलेले भाहे. यास्तव वैदिक धर्मानुयायी पुरुषांना उपदेशाकरितां दुसन्यांच्या तडिाकडे पहाण्याची मुळीच गरज नसते. शिवाय सांख्यादिकांचे सांगणे