पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५७० बृहयोगवासिष्ठसा दैन्य सहन करावे लागते. पण जो उदारात्मा त्रैलोक्याला सदा तणासारखें तुच्छ समजतो त्याला, सर्प जसे कात टाकितात त्याप्रमाणे, सर्व आपत्ती सोडतात. अशा विरक्त पुरुषाच्या अंतःकरणांत ज्ञानाची जेव्हां थोडीशी कलाही उद्भवते तेव्हा आपत्तीची शंका तर दूरच राहूं दे पण त्याच्या रक्षणाचीही त्याला चिंता करावी लागत नाही. कारण लोकपाल, ब्रह्मांडा- प्रमाणे, त्याचे रक्षण करितात. यास्तव साधक अवस्थेत असताना एकादे वेळी भयकर आपत्ति जरी येऊन कोसळली तरी असन्मार्गाने जाऊं नये. कारण उन्मार्गाने अमृत पिणाराही राहु मरण पावला. उग्र प्रकाश देणान्या सच्छास्त्र व साधुसमागमरूपी सूर्याचा जे आश्रय करितात ते पुनः मोहा- न्धकाराला वश होत नाहीत. ते स्वतत्र होतात. त्याच्या सर्व आपत्ती क्षय पावतात. ज्यानी वैराग्यादि गुणान्या योगाने मोठे यश सपादन केले आहे त्याचें अक्षय कल्याण होते. वैराग्यादि गुणाचे उत्तरोत्तर अधिक संपादन करावे असें ज्यास वाटते, अध्यात्मशास्त्राभ्यासाची ज्याना मोठी आवड असते आणि सत्याचे व्यसनच लागलेले असते तेच पुरुष बाकीचे सर्व पशू. ज्यांच्या यशश्चदिकेने (म्हणजे यशोरूपी चादण्याने ) प्राण्यांचे हृत्सरोवर प्रकाशित केले आहे त्या क्षीरसागराच्या मूर्तीमध्ये हरि रहातो. बाबारे राघवा, या अनादि ससारात अनेक जन्म घेऊन, प्रत्येक प्राण्याने सर्व भोग भोगलेले असतात. सर्व अनुभव घेतलेले असतात. मग आणखी उत्तर जन्मपरपरेमध्ये पडून स्वात्मविनाश करण्याकरिताच पुनः भोगां- विषयी लुब्ध होणे योग्य आहे का ? मुळीच योग्य नव्हे. यास्तव आपल्या अधिकारानुरूप, यथाशास्त्र, पूर्व पूर्व आचार्यांनी प्रवृत्त केलेल्या संप्रदाया- प्रमाणे, एकेका भूमिकेत, त्या त्या भूमिकेचा परिपाक होई तों, स्थिर राहून मिथ्या भोगजालावरील आस्था कमी करावी. स्वर्गापर्यंत जाऊन पोचणान्या गुणाच्या योगाने कीर्तिमान् व्हावे. साधुजनांच्या तोंडूनही धन्यता मिळवावी. कारण कीर्ति व साधुवाद प्राण्याला मृत्यूपासून तार- तात. भोग कधीही तारीत नाहीत. सिद्धांच्या सुंदर स्त्रिया, ज्यांचे चंद्रतुल्य शुभ्र व आकाशतुल्य सर्व देश-कालव्यापी यश गीतींच्या द्वारा गातात बेच जिवंत असून बाकीचे मृत होत. दीर्घ प्रयत्न व सतत उद्यम करून न कटाळता, यथाशास्त्र आचरण करणारा कोणता पुरुष सिद्धीला पात्र होणार नाही ? पण यथाशास्त्र व्यवहार करणाराने सिद्धीविषयी स्वरा