Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. उद्भवेल त्याप्रमाणे प्राणी देव, मनुष्य, पशु इत्यादि योनीतील कोणत्या तरी एका योनीत उत्पन्न होतो. अर्थात् हे जग मनोराज्याप्रमाणे, कल्पनेने बनविलेल्या वस्तूप्रमाणे, किवा गारुडाप्रमाणे. भ्रमरूप आहे. भोवळ आलेल्या मनुष्यास जसे हे सर्व जग भ्रमण करीत असल्याप्रमाणे दिसते त्याप्रमाणे, बालकास भिवविण्याकरिता दाखविलेल्या बाऊलबुवा- प्रमाणे, आकाशातील मोत्याच्या समूहाप्रमाणे, नावेत किवा गाडीत बसून जाणारास जसे बाजूचे वृक्ष चालत आहेत, असे दिसते त्याप्रमाणे व स्वप्नात पाहिलेल्या नगराप्रमाणे, मत पुरुप आपल्या कल्पनेने जग बनवितो व जन्मास आलेला जीवही अशाच रीतीने त्याचा अनु- भव घेता तर मग ते नित्य आहे, असा भास कसा होतो ? म्हणून म्हण- गील तर सागतो. दीघकाल परिचय झाल्यामुळे ते कल्पनामय जग- दृढ होऊन बसले आहे. साराश इहलोक, परलोक, जन्म, मरण, जन्मा- नतर होणान्या क्रिया इत्यादि सर्व वासनामय व कल्पनामय आहे, पण मूळाचा उच्छेद झाल्यावाचून या दीर्घ कल्पनचा उच्छेद होणे शक्य नाही अविद्या ह्मणजे आत्म्याचे अज्ञान हेच याचे कारण-मूळ-आहे रामा, या परमात्म्याचे ठायी हे जन्म-सृष्टिरूप तरग वारवार उठत आहेत. त्यातील काही पुन जसेच्या तसंच उठतात, काही अर्धे किवा अर्धे अ- धिक पूर्वी प्रमाणे असून बाकीचे अगदी नवीन असतात व काही तर अगदीच अपूर्व असतात. यावेळी जो हा व्यास येथे बसला आहे तो बत्तिसावा आहे, असे मला आठवते. पण ते मागचे सर्वच व्यास सारख्या योग्यतेचे नव्हते. त्यातील बारा केवल ब्रह्मज्ञ होते व त्या सर्वानीही आ- पले नियत काम एकसारिखेच बजाविले. दहा व्यास एकमेकाहून अगदी भिन्न झाले व बाकीचे आपल्या कुलाहून अगदी भिन्न स्वभावाचे निपजले. अजूनही अनेक व्यास, वाल्मीकि, भगु, अगिरा इत्यादि मुनी, देवी, देवाचे समूह, मनुष्य इत्यादि होऊन जाणार आहेत. आज असलेले हे त्रेतायुग आजपर्यत कितीदा तरी होऊन गेले आहे व या पुढेही अनेकदा होऊन जाईल. या व्यासाचा हा दहावा अवतार आहे अजून याला आठ वेळा द्वापरयुगाच्या अती जन्म घेऊन वेदाचे विभाग व महाभारत करावयाचे आहे हे नेमलेले काम सपलें ह्मणजे आपले कुल प्रख्यात करून तो हिरण्यगर्भ होईल व तोही सर्वोत्तम अधिकार समाप्त झाला ह्मणजे विदेहमुक्त होईल.