पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११९ ४ स्थितिप्रकरण-सर्ग ३२. नावाचा एक अमात्य राहील. त्या ज्ञानी पुरुषाला बंध व मोक्ष हातावरील आवळ्याप्रमाणे साक्षात् दिसतील. त्याच्या गृहांत कट-असुर शालूखी-पक्षी होऊन रुप्याच्या पिजन्यांत आनंदाने राहील. नरसिंह-अमात्य दाम-व्याल- कटाची कथा काव्यरूपाने रचील व तो ती वाचीत असतांना पिजन्यांतून ऐकून, कटाला आपल्या पूर्वजन्माचे स्मरण होईल. सर्वत्र आत्माच भरून राहिला आहे. त्यावाचून या सृष्टीत दुसरे काही नाही, असेही त्याला त्या कथेतील वर्णनावरून कळेल आणि त्याविषयी त्याचा पूर्ण निश्चय झाला म्हणजे तो शातरूप होऊन निजरूपास पोचेल. चिमणा व मुरकुट झालेल्या व्याल व दाम-दैत्यासही ती सर्वतोमुखी झालेली काव्यमय कथा प्रसगोपात्त ऐकू येईल आणि त्यामुळे त्यानाही आत्मज्ञान होऊन तेही मुक्त होतील. राघवा, याप्रमाणे मी तुला ही दाम-व्याल-कटाची कथा सागितली आहे. त्याच्या जन्मादिकाप्रमाणे हा ससारही शून्य आहे. मायामय आहे. पण भ्रामक द्वैत-ज्ञान प्राण्याला फार मोठ्या पदापासून च्युत करून अधोग- तीस लावते. त्रिभुवनाला भिवविण्याचे सामर्थ्य कोठे व खाबांतील मशक, भितीतील चिमणी व मत्र्याच्या घरच्या पिजन्यातील साळुकी कोठे ? राजस-अहकाराने रजित झालेल्या चिदाकाशालाच, स्वरूप न सोडता, विरूपाचे भान होते. (म्हणजे स्वाभाविक स्त्रप्रकाशतेचा त्याग न करताच ते अहंकार, प्राण, मन, इद्रिये, देह इत्यादिरूप होते. ) असत्य असतानाही सत्य असल्याप्रमाणे वाटणान्या आपल्या वासनाभ्रांती- मुळेच प्राणी हा कोणी आपल्याहून भिन्न पदार्थ आहे असें तें ( चैतन्या- काश ) जाणते. यास्तव असल्या या मिथ्या ससारसागरातून तरून पार जावयाचे असल्यास बुद्धीचा प्रवाह आत्म्याकडे वळवून महावाक्यादिरूप शास्त्राच्या योगाने हे सर्व दृश्य असत् आहे असा निश्चय केला पाहिजे. शुष्क तर्कमय मताचा अवलब करणे यासारखी आत्महानि दुसरी कोणतीही नाही. आमच्या या उपनिषत्प्रतिपाद्य मार्गाला अनुभवही पुष्टि देतो. तार्कि- कांच्या तर्काने ठरविलेल्या मार्गाला अनुभवाचे पाठबळ मुळीच नसते. भाम्हीं सागत असलेल्या या वैदिक मार्गाने जाणान्या साधूची ऐहिक व पारलौकिक पुरुषार्थ-हानि कधीही होत नाही. हे मला हवे, असे म्हणून कुव्याप्रमाणे आशेने एक क्षणभरही चित्त व शरीर स्थिर न ठेवता इत- स्ततः पळणाऱ्या दुर्भाग्याला मातीसुद्धा मिळत नाही. उलट त्याला भयंकर-