पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६८ बृहद्योगवासिष्ठसा. दिसणान्या केसाप्रमाणे अज्ञाला परमार्थच जग दिसते. परंतु शुद्धदृष्टि पुरुषाला हे जगच चिदाकाश दिसते. सारांश अध्यारोपदृष्टया सर्वव्यापी चिदाकाशांत सर्वांचा आरोप होणे शक्य असल्यामुळे सर्वत्र सर्व आहे. पण अपवाददृष्टया कोठेही काही नाही ३१. सर्ग ३२-दामादिकांच्या अनेक योनी, शेवटी प्राप्त झालेला मशकादि भाव, ज्ञान व मोक्ष. श्रीराम-विद्वद्वर्य, बरें असो, बालकानी कल्पिलेल्या यक्ष-पिशाचा- प्रमाणे दाम, व्याल व कट हे जरी सत्-असत-रूप असले तरी त्यांच्या दुःखाचा अत कसा व केव्हा होणार ? श्रीवसिष्ठ-रामा, त्या दैत्याच्या आप्त-संबधी यमकिकरानी त्याच यमराजाची नम्रपणे प्रार्थना केली असता धर्मराज त्यास म्हणाला " त्याचा परस्पर वियोग होऊन ते जेव्हा आपली ही कहाणी ऐकतील तेव्हा मुक्त होतील." रामभद्रा, पितृपतीच्या या सागण्याप्रमाणे ते पुढे कसे मुक्त होतील ते मी सागतो ऐक. काश्मीरातील महापद्मसरोवराच्या तीरावरील चिखलात दीर्घकाल मत्स्ययोनीचा अनुभव घेऊन ते त्या योनीतून मोठ्या कष्टाने सुटतील आणि त्याच पद्मसरोवरात रा रस पक्षी होतील. विविध जातीची कमलें, सुंदर तरंग, रम्य शेवाळ, हालणारे पुष्पगुच्छ, नील कमलाची बेटे, शीतल वायु इत्यादिकाच्या योगाने अतिशय सुशोभित व रम्य झालेल्या त्या सरोवरात भुवनभूषणभूत सारसींशी सरस भोग भोगीत दीर्घकाल विहार करतील. शेवटी त्याना विचारबुद्धि प्राप्त होऊन ते एकमेकापासून दूर होतील ज्याप्रमाणे सत्त्व, रज व तम याचे विवेक- दृष्टीने पर्यालोचन करू लागले असता मुक्तीकरिता ते भिन्न होतात त्याप्र- माणे तेही तिघे मुक्तीकरिता वियुक्त होऊन त्यातील व्याल चिमणा होईल आणि काश्मीर देशातील अधिष्ठान-नगरात एका सर्वोत्तम घराच्या ईशान्ये- कडील मितीच्या भोकात राहील. तेथें तो थोडेच अध्ययन केलेल्या ब्राह्मणाच्या अर्थरहित शास्त्रपाठाप्रमाणे ची-ची-ची असा शब्द करीत आनंदाने काल घालवू लागेल. दाम-दानव त्याच नगरांतील श्रीयश- स्करदेव नावाच्या राजाच्या राजमदिरातील एका मोठ्या स्तंभाच्या छिद्रात मृदुध्वनि करणारा मशक होऊन राहील. त्याच अधिष्ठान-नगरात रत्नावली-विहार नावाचे क्रीडागृह असेल. त्यांत राजाचा नरसिंह या