पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ स्थितिप्रकरण-संर्ग ३१. असते व 'हा मी' असेंही वाटत असते. पण यांतलें सत्य काय व मसत्य काय याचा निर्णय करता येत नाही. तो व्हावा असें तर त्याला मनापासून वाटते. यास्तव असा पुरुष उपदेशाचा अधिकारी आहे. ज्ञानी सत्य-एका- त्ममय व अज्ञानी मिथ्या अहंतामय. तेव्हा त्याच्या स्वभावामध्ये बदल कसा करितां येणार! ज्ञान्याच्या दृष्टीने जग जसें असत् तसाच प्राकृताच्या दृष्टीने परमार्थ असत्. यास्तव जो अति ज्ञानी व भति अज्ञानी असतो तो उपदेशाचा अधिकारी नव्हे. तर जो अल्पबुद्ध असतो तोच तत्त्वज्ञानाचा अधिकारी आहे. असो; हे रामा, तं, मी व हे सर्व शास्त्रदृष्टया, विद्वान् पुरुषांच्या अनुभवदृष्टया व युक्तिदृष्टयाही देहरूपाने असत् आहेत. दामादिक दैत्यही तसेच असत. 'तर मग सत्य काय' झणून विचारशील तर सांगतो. शुद्ध, बोधाकाश व निरंजन सवेदन (ज्ञान) सत्य आहे. ते सर्वगत, शात व अस्तोदयरहित आहे. सर्व जगतही शांत आहे. पण तें शून्य नव्हे. तर मग शांत झणजे काय? तर सर्वशून्य असल्यासारखे सन्मात्रपूर्ण आहे. ( केवल सत्तेने भरलेलें आहे.) तर मग हे सर्व दिस- णारे काय आहे ? निव्वळ भास. ज्याच्या दृष्टीला तैमिरिक रोग झाला आहे त्याच्या डोळ्यापुढे जसे काळे कुरळे केस दिसतात त्याप्रमाणे मनोरूपी दृष्टीला संस्काररूपी दीर्घ रोग झाल्यामुळे जगाचा भास होतो. यास्तव या त्रिभुवनांत सत्य किंवा असत्य असे काही नाही. चिद्रूप जसे जाणते तसे सर्व होते. राजपुत्रा, जसे दामादि राक्षस तसेच आमीहि सत्य व असत्य आहो. मग त्याच्याच विषयीं तेवढा सशय घेण्यात काय अर्थ आहे ? भात चित् ज्या आकाराने उदय पावते त्या आकाराचें हे सर्व होते. दामादिकांच्या आकारोत्पत्तीचाही तोच प्रकार आहे. आप- त्याच स्वमप्रतिभासाला लोकांनी जग असे नाव दिले आहे. चिदाकाश बाह्यार्थरूप झाले झणजे तेंच दृश्य जग होय, असे समज. पण बाखाकार सोडून ते स्वरूपाने स्थिर झाले म्हणजे तोच मोक्ष. चिदाकाश प्रबुद्ध (जागें) झालें की जग व ते स्वस्थ निजलें म्हणजे मोक्ष. पण या दोन अवस्थाही बोधाकरितां कास्पिल्या आहेत. त्या खऱ्या नव्हेत. चिदाकाशच जगत्, निर्वाणच सर्गश्री व सर्गश्रीच निर्वाण होय. घट व कलश या पर्यायशब्दांप्रमाणे त्यांच्या अर्थात भेद नाही. रोगि-दृष्टीका