पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ३१. ५६५ श्रीवसिष्ठ-यास्तव, हे महामते रामा, तुझ्या बोधाकरितां, दामादि- कांचा न्याय तुझ्या ठायीं प्राप्त न हावो असें, मी वर म्हटलें. विवेकाचें अनुसंधान न केल्यामुळे चित्त अशा आपत्तीत पडते आणि अनंत संसार. दुःखे भोगते. देवांचा विध्वंस करणान्या शंबराच्या सैन्याचे नायकत्व कोठे व तापलेल्या चिखलांत पडून जर्जर करणारी मीनता कोठे ? इंद्रादिकास पळावयास लावणारे ते मोठे धैर्य कोटें? व किरातराजाची क्षुद्र चाकरी कोटें? निरहंकार-अवस्थेतील उदारता कोठे व अंतःकरणात मिथ्या वासना शिर. ल्यामुळे उद्भवलेली अहकार-कुकल्पना कोठे? शाखा-विस्तारानें गहन झालेली ही संसार-विष-मंजिरी अहंकाराकुरापासूनच उद्भवते यास्तव रामभद्रा, दीर्व प्रयत्नाने अहंकराचे परिमार्जन कर दृक् व दृश्य या दोन जातींच्या पदार्था- वाचून या त्रिभुवनात आणखी काही नाही. यास्तव अहं ह्मणून निराळे काहीएक नाही, असे समजून तू सुखी हो. आनदैकरस व तापत्रयशून्य असें परमार्थ-चंद्रमडळ, अहंकारमेघाने झांकून टाकल्यामुळेच, प्राकृतास दिसेनासे होते. शंबराने मायेनें निर्माण केलेले व त्यामुळेच असत् असलेले ते तिघे राक्षस अहंकार-पिशाचाने पछाडल्यामुळे सत्तायुक्त झाले. आणि आता काश्मीरातील डबक्यात चिखल पीत पडले आहेत. श्रीराम-पण प्रभो, असत् वस्तूची सत्ता व सद्वस्तूची असत्ता होणे शक्य नाही. मग असे असताना ते असत् दैत्य सत्तासपन्न कसे झाले ? श्रीवसिष्ठ-रामा, तूं ह्मणतोस ते खरे आहे. कोणतेही असत् सत् होणे शक्य नाही. पण सूक्ष्म वस्तूच सदा आविर्भावाच्या योगाने वृहत् (मोठी) होते. तीच वस्तूची उत्पत्ति आणि बृहत् वस्तुच तिरोभावाने सूक्ष्म होते. तोच नाश होय. पण दशरथतनया, या सृष्टीत सत् काय आहे व असत् आहे ते आधी तू मला साग. म्हणजे मग मी तुझ्या प्रश्नाचें निदर्शनपूर्वक उत्तर देईन. श्रीराम-गुरुवर्य, हे आह्मी येथे असलेले सर्व सत् आहो. पण शंब- राने मायेने उत्पन्न केलेले दामादिक असत् होत, असें मी समजतों, श्रीवसिष्ठ-रामा, दामादिक मायामय होते व त्यामुळेच ते असत्य. पण असत्य असूनही ते जसे मृगजळाप्रमाणे सत्य असल्याचा भास झाला तसेच हे सर्व आम्हीही असत्य असून सत्यासारखा व्यवहार करतो. येतो, जातो, बसतों व बोलतो. त्वद्भाव व मद्भाव (म्हणजे तूं राम व