पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ बृहद्योगवासिष्ठसार. लाडकी कन्या, हे माझें घर, इत्यादि वासनांनी तर त्यांच्या चित्तात कायमचेच ठाणे दिलें. एकदा तेथील काम कसे काय चालले आहे ते पहाण्याकरितां धर्म- राज ( यम ) तेथे गेला. तेव्हा दुसऱ्या सर्वांनी त्याला प्रणाम केला. पण या तिघांनी तो कोण आहे हेच ठाऊक नसल्यामुळे, हा असाच कोणी असेल असे समजून, त्याला प्रणाम केला नाही. तेव्हां यमराजानें केवळ भ्रभंगानेच त्यांना जळणाऱ्या उप्रभूमीत फेकले. त्याबरोबर आक्रोश कर- णाऱ्या सर्व परिवारासह, वणव्यात जळणाऱ्या एकाद्या शाखा- पर्णयुक्त वृक्षाप्रमाणे ते दग्ध झाले. नतर त्याच आपल्या क्रूर वासनेमुळे ते पशु, पक्षी इत्यादिकाना बाधणारे ( पकडणारे ) किरात झाले. पण त्या जन्मांतही त्याना किरात राजाचे किंकरच होऊन रहावे लागले. काही दिवस त्या योनीत राहून व अनेक कर कमें करून ते अधोगतीस लागले. उत्तर जन्मी ते कावळे झाले. त्यामागून क्रमाने गृध्र, पोपट, डुकर, बकरे, व किडे होऊन ते निर- निराळ्या प्रदेशी फिरले. त्यानतर त्या दुर्बुद्धींनी दुसन्याही अनेक योनीत तसेच जन्म घेतले. अनेक विचित्र दुःखाचा अनुभव घेतला आणि आता, हे रामा, ते काश्मीराजवळच्या एका अरण्यातील डबक्यात मासे होऊन राहिले आहेत. उन्हाळ्यात ते सुकून जातात, पावसाळ्यात पुनः तेथेच पुष्ट होऊन काही दिवस मौज करितात पण पुढे शरदृतु लागून पाणी आटत चाललें म्हणजे तेथेच चिखल पीत मोठ्या कष्टाने राहतात. फार दिवसाच्या जुन्या चिखलात रुतून राहणाऱ्या त्याना मरणही येत नाही व ते चागलेसे जिवंतही नसतात. सागश, प्रिय शिष्या, ते तिघे अजिक्य राक्षस अह-वासनेमुळे अनर्थात पहन, अनेक विचित्र योनींचा पुनः पुनः अनुभव घेऊन आणि जलाशयातील तरगाप्रमाणे पुनः पुनः उत्पन्न होऊन पुनः पुनः नाश पावत राहिले आहेत. वासना-तंतूने प्रेरणा केल्यामुळे ते तृणासारिखे तुच्छ झाले व भवसागरात पडून देहरूपी तर- गाच्या योगाने नाना प्रदेशात फिरले. त्याना अजूनही शाति मिळाली नाही. यावरून तुं माता वासनेच्या दारुणतेची कल्पना कर ३०, सर्ग ३१-महंमानामुळे पुरुषार्थाची हानि व अनर्थाची प्राप्ति होते. दामादिभा. वांच्या सत्वासत्त्वाचे निराकरण,