पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ स्थितिप्रकरण-सर्ग ३०. ५६३ कांटे शिरले. कित्येक वृक्षांच्या मनांवर पडून मान, किंवा पाठ, किंवा कंबर, अथवा हातपाय मोडल्यामुळे भूमीवर तडफडत व हाय हाय करी- तच कोसळले. कित्येकांची मस्तकें दगडावर हापटल्यामुळे त्यांची नार- लाप्रमाणे शकले उडाली. कित्येकाची आतडी मात्र वृक्षावर लोंबत राहून शरीरें खाली माली. कित्येकांची हाडे मोडली. काहीजणाचे, तोंडघशी पडल्यामुळे, दांत मोडले. कित्येकांचे डोळे फुटले आणि कित्येकांच्या जिभा दांतांखाली सांपडून तुटल्या. साराश दामादिकांच्या अधैर्यामुळे सर्व राक्षस- सैन्याची अशी दुर्दशा झाली. सर्वांची अंगें फुटली. सर्वाच्या भंगांतील रक्तांचा पृथ्वीवर सडा घातल्यासारखा झाला. सर्व हाय हाय करून आक्रोश करूं लागले आणि असंख्य दैत्यांचे प्राण गेले. राघवा. याप्रमाणे देवाचा विजय होऊन दैत्यांचा पूर्ण पराभव झाला असतां मरून व अतिशय व्याकुळ होऊन पडलेल्या दैत्यावाचून इतर सर्व राक्षस एका क्षणांत नाहीसे झाले. समुद्रात पडलेल्या धुळीच्या कणाप्रमाणे त्यांचा कोठे मागमूसही लागला नाही २९. सर्ग ३०-दामादिकांना अहंकारामुळे पुढे अनर्थपरंपरेत पडावे लागले. श्रीवसिष्ठ-राजपुत्रा, याप्रमाणे दानवाचा पराभव होऊन देवाचा हर्षोत्पादक विजय झाला असता दाम, व्याल व कट खिन व भयविहल झाले. शंबराला जेव्हा हा वृत्तांत कळला तेव्हां तो दामादिकांवर अतिशय रागावला आणि ते उन्मत्त सेनापती कोठे आहेत असे विचारूं लागला. पण सैन्याचा भयंकर नाश झाल्यामुळे कोपाविष्ट झालेला राजा शंबर भामां- लाच शोषित आहे असे कळतांच ते तिघही भयभीत झालेले दैत्य आपला प्रदेश सोडून सातव्या पाताळांत गेले. तेथे मृत्यूप्रमाणे शंबरादि सर्व प्राण्यांना भिवविणारे यमकिंकर होते. त्याना हे तिघे शरण गेले. तेव्हां त्या निर्भय नरकपालकांनीही त्याना अभय देऊन तेथे ठेवून घेतलें. त्यांची विवाह करण्याची इच्छा आहे, असे पाहून मूर्तिमती तीन चिताच अशा तीन कुमारी त्यांनी त्याना दिल्या. त्याच्यासहवर्तमान ते तेथें आयुष्य घालवू लागले. नरकातील त्या रमणीसह ते तिघे यथेच्छ विषयसुख भोगीत दहा हजार वर्षे राहिले. तेवढ्या अवकाशांत यांना अनेक कुवासना जडल्या. ही माझी प्रियभायो, हा माशा आनंद देणारा पुत्र, ही माझी