पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६२ बृहद्योगवासिष्टसार. ठिकाणी भासलेल्या सर्पाप्रमाणे ममत्वाची व्यर्थ कल्पना केली. हा माझा नखशिखांत देह स्थिर कसा होईल, या तृष्णेनें कृपण झालेले ते तिघेही दीन झाले. माझें शरीर स्थित राहून शिवाय माझ्या सुखाकरिता मला धन मिळो अशी आस्था धारण करणाऱ्या त्यांचे धैर्य गळाले. वासनायुक्त झाल्या कारणाने त्यांचे बळ कमी झाले. पूर्वी केवळ शना मारण्यामध्येच ते जसे तत्पर होते तसे आतां राहिले नाहीत. म्ह. त्यांचा प्रहारपरता पार नाहीशी झाली.) या सृष्टीत मामी देव कसे होऊ या चिंतेने ते परतत्र व दीन झाले. जलरहित कमलां- प्रमाणे त्यांची मुखश्री पार नाहीशी झाली. अहंकारयुक्त झालेल्या त्यांच्या चित्तांत स्त्री, अन्न, पान, इत्यादि विषयाविषयींची भयंकर आसक्ति उत्पन्न झाली. ती त्यांना अनर्थमय संसारांत लोटणारीच होती. असो अहंकृतीमुळे ते दैत्य जीविताची अपेक्षा करू लागले. माझी मरूं की काय ? आम्हांला हे मारतील की काय? या चिंतेने त्याची चित्रे ज्याकुळ झाली. रागावलेल्या ऐरावतामुळे भयकर झालेल्या रणात ते मंद मंद संचार करू लागले. तेव्हा केवल शरीराची इच्छा करणा-या व मृत्यूला भ्यालेल्या त्यांचे सत्व कमी झाले, भाणि शत्रूनी त्यांच्या मस्तकावर 'पाय ठेवला. सर्व जळण संपलें असतां अग्नि जसा जाळू शकत नाही त्याप्रमाणे त्यांचे सर्व धैर्य नाहीसे झाले असता ते पुढे आलेल्या सामान्य देवालाही मारण्यास समर्थ झाले नाहीत. देव वेगाने सर्व सैन्याला मारूं लागले असता ते दीन झालेले दामादि सेनापती मशकासारखे झाले. तात्पर्य रामा, मरणास भ्यालेले ते सर्व दैत्य, देव रणात विजयी होऊ लागले असता, युद्धापासून पराङ्मुख झाले. दाम, व्याल व कट स्वर्गामध्ये फार प्रसिद्ध झाले होते. पण ते रण सोडून पळू लागले असता त्याचे, वाट फुटेल तिकडे पळणारे, दैत्यसैन्य आकाशांतून खाली इतस्ततः पडले. पर्वत, नद्या, वृक्ष, वनें, उपवनें, नगरें ग्राम, माळ जमीन, दलदलीची जागा इत्यादि पृथ्वीवरील सर्व इष्टानिष्ट स्थानी ते अस्ताव्यस्तरीतीने पडू लागले. शत्रूच्या शस्त्रांनी भंगे छिन्न भिन्न होऊ नयेत म्हणन जीव घेऊन धावणारे व अडखळून पडणारे ते व्याकुळ झाले. आकाशातून खाली पडतांना कित्येक जलाशयांत पडून गटंगळ्या खाऊ लागले. कित्येक काव्यांमध्ये पडले आणि त्यामुळे त्यांच्या अंगांत अनेक