पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग २९. करण्याकरिता त्यांच्याशी घोर युद्ध केलें. खों, बाण, शक्ती, मुद्गर, मुसळे, गदा, परशू, शंख, चक्र, अशनी, पर्वत,शिला, अग्नि, व दुसरीही अनेक आयुधे याचा वर्षाव उभय पक्षाकडून एकसारखा होऊ लागला. कोणत्याही युद्धांत प्रायः होणारे सर्व घोर अतिप्रसग या युद्धप्रसंगीही झाले. देव मुद्दामच असुरांना थकविण्याकरिता हळु हळु युद्ध करीम होते. सृष्टी- तील सर्व प्राणी दुःखी झाले. त्या मत्त देवामुरानी त्राहि त्राहि करून सोडले. वीरांचा सिंहनाद, रणवाद्यांचा घोष व दुःखिताचा आक्रोश यांच्या योगाने त्रिभुवन भरून गेले. अकाली कल्पातच होत आहे की काय ? असा भास झाला. साराश अशास्त्रीय चित्तवृत्ती व शास्त्रीय चित्त- वृत्ती याचा चित्तभूमीत भयकर सग्राम सुरू झाला असता संसार जस अति दुःखद होतो, त्याप्रमाणे तो देवासुर सग्राम सृष्टीस दुःखदायी झाला! सर्ग २९-दामादिकास अभिमान वाटं लागतो त्याचा विषाद, पलायन व पराभव. श्रीवसिष्ठ-रामचद्रा, याप्रमाणे शत्रूचे प्राण घेणाऱ्या असुरानी संग्राम सतत चालविला. देव कदाचित् कपटाने, कदाचित् वाग्युद्धानें, केव्हां कव्हा दानादि उपायानी, केव्हा पळून जाऊन व एकादे वेळी आपल्या लोकाना लपवून ठेवूनही पुष्कळ दिवस युद्ध करीत राहिले. त्याचे पहिले युद्ध तीस वर्षे चालले होते. दुसरे पाच वर्षे, आठ महिने व दहा दिवस टिकलें आणि तिसरे युद्ध बारा दिवसच झाले. पण त्यातील प्रत्येक युद्ध एक- सारखेच भयकर होते. इतक्या अवकाशात दामादिकास अहंकार वाटला. वासनेने ज्याच्या चित्तास ग्रासले आहे अशा त्या तिघानाही 'मी' अशी आस्था वाटू लागली. समीप असलेल्या दर्पणात जसें प्रतिबिंब पडते त्याप्रमाणे त्यांच्या चित्तात अति अभ्यासामुळे अहंकार उठला. दूर अस. लेली वस्तु जशी आरशात प्रतिबिबित होत नाही त्याप्रमाणे अभ्यासाच्या अभावी पदार्थवासनाही उद्भवत नाही. दामादिकांना जेव्हां अहकार झाला तेव्हा माझे जीवित असेच राहवें, मला धन मिळावे इत्यादि दैन्य त्याच्या- मध्ये आले. त्यानंतर विहित-निषिद्ध प्रवृत्तीविषयी वासना आणि माझा देह असाच नीरोगी, दृढ व भोग घेण्यास समर्थ असावा अशी मोहवासना यांच्या योगाने ते ग्रासले गेले; आशापाशांमध्ये अडकले आणि त्यामुळे दीन झाले. अरे अरे, अहंकारशून्य असलेल्या दामादिकांनी रज्जूच्या