पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० वृहद्योगवासिष्ठसार. सनेमुळे 'भरे देहाचा नाश झाल्यास माशाच नाश होईल ' असे समजून प्राणी दीन होत असतो आणि असे झाले तरच तो पराभूत होतो. पण तशी वासना नसल्यास मशकही मेलसारखा अचल (निश्चल ) राहतो. जेथें वासना असते तेथेच ती पुष्ट होते. कारण गुण गुणीच्या ठायींच वृद्धि पावत असतो. निर्गुण पदार्थाचे ठायीं गुण-वृद्धि होणे शक्य नाही. ___ यास्तव बा इंद्रा, दामादि दैत्य 'हा मी, हे माझे' असे भांतल्या भात समजतील असें तूं कर. प्राण्याच्या सर्व विपत्ती व दशा तृष्णाकरंज-वेलीच्या कह व कोमल मजिन्या आहेत. वासनातंतु जसा जसा वाढेल तसें तसें प्राण्याचे दुःखही वाढते. यास्तव सुज्ञानें वासनेचा क्षय करावा. तिला उगीच वाढवू नये. कारण वासनाक्षय साक्षात् सुख देत असतो. धीमान, बहुश्रुत, कुलीन व मोठा माणूसही, सिंहाप्रमाणे, तृष्णारूपी शृंख- लेने बांधला जातो. देहरूपी वृक्षावर नसलेल्या व हृदयरूपी घरव्यांत रहा- णान्या चित्तपक्ष्यास अडकविण्याचे तृष्णा हे जाळे आहे. वासनेनें दीन झालेल्या जीवालाच कृतान्त ओढून नेत असतो. यास्तव तू शस्त्रे जमवून संग्राम करावयाच्या नादी लागू नको. तर आधी युक्तीने वासना उत्पन्न करून त्यांच्या बुद्धीचा भेद कर. वासनेने अंतःकरण क्षुब्ध होई तों कोणतेही शस्त्र किंवा अस्त्र त्या शत्रूवर चालणार नाही. शास्त्रांचाही तेथें काही उपयोग होणार नाही.. हे दामादि तीन अजिंक्य व मत्त राक्षस युद्धाच्या अभ्यासाने लवकरच अहकारमयी वासना धारण करतील. तोपर्यंत तुझी युक्तीने त्यांच्याशी लढत रहा. त्यांना अहंकार झाला की ते लगेच इतर राक्षसांप्रमाणे तुझांस सहज जिंकता येतील. कारण हे सम-विषम जग अतर्वासनेनेच स्थिर झाले आहे २७. सर्ग २८-देव थोडी विश्रांति घेऊन पुन. युद्ध करूं लागले. श्रीवसिष्ठ-दशरथतनया, देवांना असे सांगून ब्रह्मा गुप्त झाला. देवही ते ऐकून आपापल्या इष्ट स्थानी गेले. काही दिवस आपल्या स्थिर- कोतियुक्त रम्य गृहांत राहुन त्यानी विश्रांति घेतली आणि भाता भनुकूल काल आहे असे जाणून त्यांनी आरमोत्कर्ष करणारा शुभ दुर्बुमिनिर्घोष केला. तेव्हां दैत्यही, पावसाळ्यांत भूछिद्रातून वर निघणाऱ्या पंखांच्या किड्यांप्रमाणे, पाताळांतून भराभर वर निघाले. देवांनी कालक्षेप