पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग २७. ५५९ दाम-व्याल-कटांचा पराक्रम सागितला. त्याचे म्हणणे ऐकून चतुरानन त्यांस असें समाधानाचे वचन बोलला- देवांनो, शंबराची आयुर्मर्यादा अद्यापि क्षीण झालेली नाही ती क्षीण होई तो तुझी धीर धरा. त्याचा काल समीप आला ह्मणजे हरीच्या हातन तो मरेल. ज्याच्या वीयर्यास भिऊन तुह्मी आज पळालांत त्या मायायुद्ध करणाऱ्या दामादि राक्षसांना युद्धाभ्यासामुळे आता लवकरच अहंकार वाटेल. शुद्ध भारशातील प्रतिबिंबाप्रमाणे तो त्याच्या हृदयान आपोआप स्फुरेल, आणि त्यांनी एकदा वासना धारण केली म्हणजे जाळ्यात सापडलेल्या पक्ष्याप्रमाणे ते तुझास सुजेय होतील. यावेळी ते वासनारहित आहेत. सुख-दुःखशून्य आहेत. त्यामुळे धैर्याने शत्रूस मारणारे ते अजिंक्य झाले आहेत. जे वासनातंतूने बद्ध व आशापाशांनी परवश झालेले असतात तेच दोरीत बाधलेल्या पक्ष्याप्रमाणे या लोकी वश्य होतात. ज्या धीरास वासना नसते, ज्याची बुद्धि कोठेहि आसक्त झालेली नसते, जे इष्टप्राप्ति झाली असता आनद मानीत नाहीत व अनिष्ट- प्राप्तीने दुःखी होत नाहीत ते महाबुद्धिमान् पुरुष दुर्जय होत. ज्याच्या चित्तात वासनारज्जूची गाठ घट्ट बसलेली असते तो मोठा बुद्धिमान् व विद्वान् जरी असला तरी एकादा बालकही त्याला जिकू शकतो. हा मी व हे माझे अशा कल्पनेने व्याकुळ झालेला पुरुष आपत्तींसच पात्र होतो. जेवढे हे माझे शरीर आहे तेवढाच मी आहे, असे समजणारा मोठा ज्ञानी जरी असला तरी तो कृपण होय. सर्व दुर्वासनातील आत्म्याला देहादिरूप समजणे ही वासना, सर्व अनर्थाचे बीज असल्यामुळे, मोठी भयंकर आहे. अनंत व अप्रमेय आत्म्याची इयत्ता ज्याने केली त्याने आपणच आपल्याला संसार-अनर्थात लोटले असे समजावें. आत्म्याहून निराळे असे जर काही या जगांत असते तर त्याच्याकरितां 'हे पाह्य आहे.' अशी भावना होणे योग्य होते. पण आत्मव्यतिरिक्त मुळी वस्तुच नाही. यास्तव जगातील असद्वस्तूंवर आस्था ठेवणे अगदी अनुचित होय. कोणतीही जरी आस्था झाली तरी ती अनंत दुःखांची जननी आहे व सर्वत्र अनास्था ही सर्व सुखाचे आगर आहे, असें जाणावें. देवांनो, दाम, व्याल व कट जोपर्यत संसारस्थितीविषयी आस्थारहित आहेत तों- पर्यंत ते तुझांस जिंकता येणार नाहीत. देह हाच मी आहे या अंतर्वा-