पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५५८ बृहद्योगवासिष्ठसार. सर्व स्वर्गवासी एकाएकी राक्षसांच्या समोर येऊन उभे राहिले व तत्काल देवासुराच्या घोर कदनास भारंभ झाला. त्यांत असंख्य धीराची कुड- लादिकानी सशोभित झालेली मस्तकें भराभर तुटून पडू लागली. रक्ताचे पाट वाहिले. वीरांची छिन्न भिन्न शरीरें रक्ताने माखली. शास्त्रांचा खण- खणाट एकसारखा चालला होता. दोन्ही पक्ष सबळ असल्यामुळे त्याच्या घोर कलहात इतर दुर्बळाचा विनाकारण क्षय होऊ लागला. दोन्ही सैन्यांतील मत्त वीरानी एकमेकास भूमीवर लोळविण्याचा सपाटा चालविला होता. पृथ्वींतील अनेक संपन्न राष्ट्रे, नगरें, ग्राम, भरण्ये, नद्या, पर्वत इत्यादिकाचा विध्वस झाला. प्रत्येक मानव आकाशाकडे तोंड करून व हात जोडून 'त्राहि भगवन् ' असें दीनवाणीने झणत लोककर्त्याची प्रार्थना करूं लागला. त्या देवासुरसंग्रामात अनेक रणवाद्याचे विविध धनी प्राणिमात्रास भयभीत करीत होते सर्वत्र 'हाय, हाय' हा दुःखद्योतक शब्द ऐकू येऊ लागला. याप्रमाणे तें घोर युद्ध फार वेळ झाले. देवानी भयंकर दैत्याशी लढताना मोठेच धैर्य दाखविले. पुष्कळ शत्रुना मारून पाडले. पण शेवटी दाम, व्याल व कट याच्या प्रभावापुढे त्याना हात टेंकावे लागले. त्याना प्रतिकूल चिढ़ें स्पष्ट दिसू लागली. आणि त्यामुळे इद्रादि सर्व देव निरुत्साह झाले २६. सर्ग २७–पराभूत झालेले देव ब्रह्मदेवाकडे गेले व वासनावृद्धि हाच दामादि- काच्या नाशाचा उपाय आहे असे त्याने त्यास सांगितले. __ श्रीवसिष्ठ-राघवा, रक्तमय झालेल्या रणागणांत दामाने देवाचे दमन केले, व्यालाने देवलोकाचा चूर केला व कटाने सर्व देवाना रणात शक्ति- शून्य कम्न सोडले. तेव्हा बध फुटला असता जल जसे वेगाने धावू लागत त्याप्रमाणे ते सर्व आपली क्षत शरीरें घेऊन पळाले. दामादि दैत्य त्याच्या मागे लागले. पण गुप्त झालेले देव त्याना दिसले नाहीत. पुष्कळ वेळ शोधून थकल्यावर दामादि घोर वीर पाताळांत गेले व भानदानें झालेला वृत्तांत प्रभूस सागू लागले. देवाचा झालेला नाश व पराभव ऐकून शबराला हर्ष वाटला. इकडे पराभव पावलेले देवही काही वेळ विश्रांति घेऊन जयाचा उपाय विचारण्याकरिता अमिततेजस्वी ब्रह्मदेवाकडे गेले. त्या कमलासनस्थ प्रभूला विनयाने प्रणाम करून देवानी शंबराने आणलेला प्रसंग व