पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग २६. ५५७ म्हणावे तर मुक्तांनाही पुनः जन्म प्राप्त होण्याचा संभव आहे, असे होईल.- असें ह्मणशील म्हणून सांगतों-ते स्वतंत्र जीव नव्हते. तर कर्मजीव जो शंबर त्याच्या कौशलरूप, कर्म-वासनादिकांनी पुष्ट न झालेल्या मायामयी व असार संकल्पवृत्तीचा आधार घेऊन, ते उदय पावले होते. सिद्धिमान योगी पुरुषाच्या देहभेदाप्रमाणेच शंबराचे ते तीन देह होते. ते अंधपर- परेनें वासनेवाचूनच प्राप्त क्रिया करीत असत. अर्धवट निजलेल्या बाल- कांची अंगचेष्टा ( अवयवाची हालचाल) वासना व अभिमान या दोन निमित्तांवाचून जशी होते त्याप्रमाणे त्यांची चेष्टा होत असे. युद्धसमयीं शत्र पुटून येत आहेत; विश्रांति घेत असताना ते अकस्मात् येऊन हल्ला करि. तात व अशा वेळी पलायन करून आपले रक्षण करावे इत्यादि देहाभि- मानप्रयुक्त गोष्टी त्यांना टाऊक नव्हत्या. फार काय पण जीवित, मरण, रण, जय, अजय यांचीही त्यांना काही कल्पना नव्हती. केवळ समोर जे सैनिक असतील त्याच्या अगावर जाऊन त्यांस मारावे एवढेच ते जाणत होते. ते तिघेही इतके बळकट होते की, एकेका तळ हाताच्या प्रहाराने मोठमोठ्या पर्वताचीही धूळ उडवीत असत. ___ असो; अशाप्रकारच्या या घोर मायाराक्षसांस पाहून शबराच्या मनाला मोठा संतोष वाटला. या अति मत्त व ज्यांना देहाचेही भान नाही अशा माया-असुराकडून रक्षण केली जाणारी माझी सेना आतां खचित विजयी होईल व ती देवाशी लढताना कधीही क्षीण होणार नाही, अशी त्याला मोठी आशा वाटली २५. सर्ग २६-देव व दानव यांचा भयंकर संग्राम. श्रीवसिष्ठ-रामभद्रा, आशाच प्राण्याला प्रवृत्तीमध्ये पाडीत असते. शंबराला वर सांगितल्याप्रमाणे आशा वाटली असता त्याने त्या तीन राक्षसा- बरोबर भापली मोठी सेना, देवांचा नाश करण्याकरिता भूलोकी पाठविली. सशस्त्र दैत्य सागर, दया, खोरी, गुहा, झाडे, झुडपें, भुईतील खळगे इत्यादिकांमध्ये शिरून देवास शोधू लागले. त्यांनी यावा-पृथ्वीस एक करून सोडले. त्यांच्या प्रभावाने सूर्यही दिपून गेला. त्यांच्या हाल- चालीने पृथ्वीतील प्रत्येक भूत व्याकुळ झाले. सर्वत्र हाहाकार उडाला। त्यामुळे देवांना त्यांच्या पुढे येणे भाग पडले.