पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५५६ बृहद्योगवासिष्ठसार. आकाशात इथेनपक्षी कपोतांना जसे मारितात त्याप्रमाणे अनुकूल अवसर पाइन भयानक देवांनी त्यांना मारिले. पणन सागर जसा मोठाल्या तरंगांस उत्पन्न करतो त्याप्रमाणे त्या श्रेष्ठ असुराने चपल व भयकर ध्वनी करणान्या दुसन्या राक्षसांस उत्पन्न करून सेनारक्षक केले. पण देवांनी त्यांनाही लवकरच मारले. त्यामुळे अतिशय रागावलेला शबर देवांस मारण्याकरता स्वर्गलोकी गेला. पण इतक्यात त्याच्या मायेस भ्यालेले देव मेरुपर्वताच्या गुहादि गुप्त प्रदेशी जाऊन लपून राहिले. त्यामुळे कल्पाच्या शेवटी क्षीण झालेल्या जगाप्रमाणे शून्य स्वर्ग त्याला दिसला. तेथें आक्रोश करणारे क्षुद्र देवगण व अधूंनी ज्यांची मुखकमलें भिजलीं आहेत अशा अप्सरा मात्र होत्या. तेथ त्याने पुष्कळ शोध केला. पण त्याला मुख्य मुख्य देव कोठेच भाढळले नाहीत. म्हणून तेथें जेवढे ह्मणून काही सुदर होते ते सर्व घेऊन व लोकपालाची नगरी जाळून तो आपल्या लोकी परत आला. याप्रमाणे देव व दानव याचा द्वेष अगदी दृढ झाला. देव स्वर्ग सोडून दश दिशामध्ये गेले. पण शंबर जे जे सेनापती निर्माण करीत असे त्याना त्याना मात्र ते प्रयत्नाने मारीत. त्यामुळे शबराचा कोप अतिशय भडकला, देवाना आतां खावू की गिळू असे त्यास झाले. पण पाप्याला दीर्घ प्रयत्न करूनही जसें निधान सापडत नाही त्याप्रमाणे त्याला देव कोठेच सापडे- नात. ह्मणून त्याने पुनः जणुं काय साक्षात् यममूर्तीच, असे तीन घोर राक्षस निर्माण केले. शंबराच्या मायेपासून झालेले ते जणु काय तीन भयकर पर्वतच होते. त्यांतील एक शत्रुचे दमन करणारा, दुसरा शत्रूस सर्पाप्रमाणे वेढणारा व तिसरा आपल्या वीराना चटईप्रमाणे झाकून त्यांचे शत्रूच्या अस्त्रांपासून रक्षण करणारा होता. म्हणन क्रमाने दाम, व्याल व कट अशी त्यांची नावे शंबराने ठेविली. ते तिघेही प्राप्त होईल ते करणारे व चेतनामात्र धर्मवान् होते. म्हणजे इतरांपेक्षा यांच्यामध्ये हा विशेष होता. त्यांचा हा अगदी पहिलाच जन्म असल्यामुळे त्यांची पूर्व धमाधम कमें नव्हती व प्राक्तन वासनाही नव्हत्या. ते भय, शंका, पळून जाणे इत्यादि विकल्पशून्य व चैतन्याच्या सानिध्यामळे देहाचे स्फुरण होणे या एकाच धर्माने युक्त होते. पण यावर तं-काम-कर्मवासना नसतांना त्याना जन्म का घ्यावा लागला. कामादि बीजाच्या अभावीही जन्म होतो म्हणून