पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ स्थितिप्रकरण-सर्ग २५. न्यायाने मोठा अनर्थ मोढवेल व विवेकादिकांच्या दृढ अम्यासाने त्याची चिकित्सा केल्यास भीम-भास-दृढ-न्यायाने अनर्थाची निवृत्ति होईल, 'हा मी' असा जो देहादिकांच्या ठायीं मिथ्या भ्रम झाला आहे त्याचे विवेकबुद्धीनें निरसन करून देहादिकाच्या अगदी आंत व त्याहून विलक्षण भसलेल्या चित्पदाचा आश्रय करून व त्यामुळेच मनोहरहित होऊन तूं खुशाल खा, पी, जा, ये, बैस, नीज व आणखीही काय पाहिजे तें कर. त्या मनः संकल्पशून्य विरल व्यवहारामुळे तूं बद्ध होणार नाहीस २४. सर्ग २५-शंबराच्या सेनापतींना देवांनी वारंवार मारले झणून त्याने दामादि आणखी तीन राक्षसांना उत्पन्न केले व तो जयाची आशा करूं लागला. श्रीराम-भगवन , आपण वर दोन न्याय सुचविले आहेत. पण त्याचा अर्थ मला ठाऊक नाही. यास्तव कृपा करून त्याचे सविस्तर वर्णन करा. श्रीषसिष्ठ-रामा, बरे आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे मी दाम-व्याल-कट- न्याय व भीम-भास-दृढस्थिति तुला सागतो. त्याचे चागले श्रवण करून त्यातील वाटेल त्याचा तूं स्वीकार कर. सर्व आश्चर्यानी मनोरम झालेल्या पाताळकुहरात शबर या नावाचा एक मोठा राक्षस होता त्याने आकाश- नगरोद्यानात असुराची मदिरें रचली होती; कृत्रिम उत्तम चद्र-सूर्याच्या योगाने आपले पाताळमंडळ भूषित केले होते; पद्मादि मणी त्याने तेथे खड्यासारखे मुलभ करून सोडले होते. गृहातील रत्नभूत स्त्रियाच्या गाय- नानी त्याने देववधूच्या ध्वनींस तुच्छ करून सोडले होते. साराश असख्य मायिक वस्तूंच्या योगाने त्याने आपल्या लोकास संपन्न केले होते. त्रैलो- क्यातील सर्व ऐश्वर्य त्याने आपल्या अंतःपुरात साठविले होते. तो सर्व ऐश्वर्यसपन्न, सर्व सपत्तिसुभग व सर्व आश्चर्यमय होता. सर्व दैत्य सामंत त्याचे उग्र शासन (भाज्ञा) शिरसा मान्य करीत असत. सर्व असुरमंडल त्याच्या महा भुजरूपी वनाच्या छायेंत स्वस्थ विश्रांति घेत पडले होते. सर्व देवाचा नाश करणाऱ्या व प्रसंग पडल्यास आकाशातूनही गमन करणाऱ्या त्याच्यापाशी पुष्कळ सैन्य होते. त्यांत सर्व वीर राक्षसाचाच भरणा केलेला असल्यामुळे ते देवांचा नाश करण्यास समर्थ होतें. ___ पण तो मायावी राक्षस निजला असला अथवा देशांतरी गेला असतां देव वेगाने येऊन त्याच्या सैन्यास मारीत. ह्मणून शंबर दैत्याने मुंडी, क्रोध, द्रुम इत्यादि सामंत-दैत्यांस आपल्या सैन्याचे रक्षण करावयास ठेवले. पण