पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५५४ बृहद्योगवासिष्ठसार. याचाच प्रथम नाश करून सोडतात. कुकमें हाच त्यांचा मोठा थोरला कोश (खजीना) आहे. शरीररूपी घरव्यांत येताच विषयरूपी मांसाची इच्छा करणारे व कार्य आणि अकार्य हेच ज्यांचे दोन पंख आहेत असे इद्रिय-गृध्र एकसारखी धडपड करीत असतात. पण विवेकरूपी तंतूंच्या जाळ्यामध्ये ज्याने त्या शठांस अडकविलें आहे त्यांच्या शात्या- दिकांचा भग ते करूं शकत नाहीत. जो विवेक-धनवान् पुरुष सकृद्द- र्शनी रमणीय वाटणाऱ्या विषयामध्ये या निंद्य शरीरनगरात राहूनच, रममाण होतो त्याला अतःस्थ इद्रिय-शत्रु पराभूत करू शकत नाहीत. ज्यांनी आपल्या चित्ताला स्वाधीन ठेवले आहे अशा स्वशरीरपुरीत वास्तव्य करणाऱ्या पुरुषाप्रमाणे मातीच्या फार मोठ्या नगरांत रहाणारे राजेही सुखी नसतात. ज्याने इंद्रियशस कैद करून सोडले आहे व चित्ताचा दर्प घालविला आहे त्याच्या शुद्ध बुद्धी वसंत ऋतूतील मजिन्यांप्रमाणे वाढतात व भोगवासना हेमत-ऋतूतील कमलिनीप्रमाणे क्षीण होतात. एका तत्त्वाचा दृढ अभ्यास करून मनाला जिकले नाही तोवरच वासना हृदयात नाचत असतात. विवेकी पुरुषाचें मन इष्ट कार्य करीत असल्यामुळे भत्यासारखें, सत्कार्य केल्यामुळे मत्र्यासारखें व इद्रियाचे आक्रमण केल्यामुळे सामंत राजासारखे असते. विद्वानाला सुख देत असल्यामुळे मन हीच त्याची प्रिय भार्या, पालन करीत असल्यामुळे तेंच त्याचा पवित्र पिता, व मोठ्या विश्वासास पात्र असल्यामुळे तेंच त्याचा उत्तम मित्र होय. शास्त्र व अनुभव याच्या द्वारा हा मन:पिता आपलाही नाश करून घेऊन ज्ञानी पुत्राला परम सिद्धि देतो. उपदेश, चागले संस्कार व सद्गुण याच्या योगाने हा मनोमणि हृदयात फार शोभतो. हा उत्तम मनोमत्री, जन्म- वृक्षांस तोडणाऱ्या जणुं काय कुन्हाडीच, अशी कमें करावयास लावितो.. रामा, रागादि चिखलाने भरलेल्या या मनो-मण्याला विवेकजलाने धुवून त्याच्या प्रकाशाचा अनुभव घे. या भयकर संसारभूमीमध्ये तूं विवेकशून्य राहून प्राकृतांसारखा परतंत्र होऊ नकोस. या महामोहाकडे दुर्लक्ष्य करूं नकोस. सर्वोत्तम विवेकाचा आश्रय करून, सत्याची पारख करून, इंद्रिय- शत्रंस पूर्णपणे जिंकून या भवसागरांतून पार हो. तात्विकदृष्टया शरार, सुख, दुःख इत्यादि सर्व जरी मिथ्या असले तरी मोहदृष्टया त्याचा साक्षात् अनुभव येत असल्याकारणाने त्यांच्याकडे दुर्लक्ष्य केल्यास दाम-व्याल-कट-