पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ स्थितिप्रकरण-सर्ग २. एकाद्या सार्वभौम राजाप्रमाणे विराजमान होतो. मोगांच्या इच्छांमुळे रुपण व दीन झालेल्या प्राण्यांस व इंद्रियांस तो शांत व सावधान चित पुरुष वेड्यांप्रमाणे हंसतो. रामा, आतील स्वात्मसुख सोडून बाहेरचे विषयसुख घेण्याकरितां धावणान्या मनाला परतवावे. भोगाकडे नेणान्या मनोवृत्तीला विषाच्या अंकुराप्रमाणे आधी खुडून टाकावे. अगोदर लाथ मारून मागून पायां पडलें झणजे मूर्खाला आपला मोठा सन्मान केला असे वाटत असते. सूर्याच्या प्रखर उन्हाने करपून गेलेल्या शाळीच्या शेताला कुदृष्टीही (थोडासा पाऊसही) अमृतासारखी वाटते. पण जो मात झालेला नाही त्याचा केवढाही जरी सन्मान केला तरी तो त्याला बहुमान वाटत नसतो. सिंधू, गंगा इत्यादि नेहमीच तुडुब भरून रहाणान्या नद्याना पावसाच्या लहानशा पुराचे थोडेच कौतुक वाटणार आहे ! त्याप्रमाणे संपन्न स्थितीत असलेला प्राकृत अधिकाधिक संपत्तीची इच्छा करीत मुटतो. समुद्र जगास बुडवून सोडण्यास योग्य असलेले जलही आपल्या दुष्पूर जठरात सांठवितो, हे प्रसिद्धच आहे. पण तेंच, ज्या मनाचा चागला निग्रह करून नंतर त्याला थोडासा भोग घेण्यास मोकळे सोडले आहे त्याला फार मोठा आनंद वाटतो. बधमुक्त केलेल्या राजाला एकादा गाव दिला तरी फार फार मोठा लाभ झाला, असे वाटते. पण ज्याच्यावर शत्रने आक्रमण केलेले नाही त्याला सार्वभौम राज्यही पुरेसे होत नाही. रामा, हातावर हात चोळून, दांत आवळून धरून व अगाने अगाचे नियमन करून इद्रिय- शजूंना जिकावे. दुसन्यास जिंकण्याचा उत्साह धरणाऱ्या सुज्ञ पुरुषांनी प्रथम इद्रियसंज्ञक हृदय-शत्रुस जिंकावे. स्वचित्ताने ज्याना जिकलेले नाही तेच या भूलोकी सुभग, साधु व खरे पुरुष होत. राघवा, हृदयरूपी बिळामध्ये वेटोळे करून व गर्वपरवश होऊन रहाणाऱ्या मनो-भुजंगाला ज्यांनी निर्जीव करून सोडले आहे ते धन्य होत. त्या महापुरुषांस मी वंदन करितों २३. सर्ग २४-इंद्रियाचे प्राबल्य, त्यांस जिंकण्याचा उपाय व त्यांच्या पराभवामुळे होणारा प्रसाद. बोध व त्याच्या योगाने होणारा वासनाक्षय. श्रीवसिष्ठ-राघवा, महानरकाच्या साम्राज्यावर ज्यास अभिषेक केम आहे असे हे इंद्रिय-शत्रू दुर्जय आहेत. दुष्कृय हेच त्यांचे मत्त गज व आशा हेच त्यांचे तीक्ष्ण बाण आहेत. ते कृतघ्न भापल्या देहरूपी मात्र-