पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५५२ बृहद्योगवासिष्ठसार. मनोरूपी विमानात बसून हा विहार करितो. हृदयाख्य अंतःपरांत त्रिभुवन सुंदरी व शीतलांगी अशा मन्त्रीनामक प्रिय भार्येशी तो सदा रममाण होतो. चंद्राच्या बाजूस रहाणान्या दोन विशाखांप्रमाणे त्याच्या दोन्ही बाजूस सत्यता व एकता या दोन भार्या सतत उभ्या असतात. आकाशांतील सूर्याप्रमाणे संसाररूपी भरण्यांतून फार दूर गेलेला तो तत्त्वज्ञ दुःखरूपी करवतींनी कापून पाडलेल्या पण शाखांच्या द्वारा एक- मेकांस कवटाळून राहिलेल्या संसार-जंगलातील प्राणिवृक्षांस पाहतो. ज्याच्या सर्व आशा पूर्ण झाल्या आहेत व जो सर्वात्म-भाव-संपत्तीने सुंदर झाला आहे असा तो, पुनः क्षीण न होणान्या चंद्राप्रमाणे विराजमान होतो. तो भोगसमूहाचे सेवन करीत असला तरी शंकराने प्यालेल्या कालकूटाप्रमाणे ते त्याला दुःख देत नाहीत. तर एकप्रकारचे भूषण होऊन रहातात. कारण चोराला ओळखून त्याच्याशी मैत्री केला असतां तो जसा कांहीं हानि करूं शकत नाही ( कारण मैत्री करणारा त्याच्या- विषयी नेहमी सावध असतो ) त्याप्रमाणे भोगाचे खरे स्वरूप ओळखून त्याचा उपभोग घेतला असतां तो क्षणिक संतोषालाच कारण होतो. कारण नाटकगृहांत नाटक पहावयास आलेल्या व नाटक संपतांच भराभर उठून इष्टस्थानी निघून जाणान्या स्त्री-पुरुषाप्रमाणे तो संसारांत एकत्र जमलेल्या लोकांना लेखितो व त्यामुळे त्याला त्याच्या संयोगापासून हर्ष-विषाद होत नाही. प्रवाशी लोक मार्गामध्ये दिसणान्या वस्तूकडे जसे अनासक्तीने पहातात त्याप्रमाणे ज्ञानी सर्व व्यवहारास पहातो. नेत्र पर्वत, वने, सरोवरें, कमळे, वेली इत्यादि पदार्थाच्या चागल्या व वाईट अशा दोन्ही स्थितीत जसे त्यास एकसारख्याच वृत्तीने पहातात त्याप्रमाणे विद्वा- नाची बुद्धि पुत्र-मित्रादि व व्यवहार काय यांमध्ये एकाच भावनेने प्रवृत्त होते. इद्रियाना अनायासाने प्राप्त झालेल्या विषयांपासून हटवीत नाहीं व अप्राप्त विषयांच्या मागे मुद्दाम लावीत नाहीत. पिसाचा भाघात पर्व. ताला जसा कंपायमान करीत नाही त्याप्रमाणे अप्राप्त विषयाची चिंता प्राप्त विषयाची उपेक्षा त्याला कंपित करीत नाहीत. त्याचे सर्व सदेह नाहीसे झालेले असतात. सर्व जिज्ञासा गठन गेलेली असते. त्याचे सूक्ष्म व स्थूल असे दोन्ही कल्पित देह क्षीण झालेले अस. तात व त्यामुळे तो ज्ञानी आपल्या शरीररूपी सुंदर राजधानात