पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग २३. उपदेशादिकांच्या योगाने दुसऱ्याचेही हित करता येते. ही अज्ञांच्या अनंत दुःखाच्या परंपरेला जरी कारण होत असली तरी ज्ञान्यांच्या अनंत सुखांचे भाडारच होते. कारण ही नष्ट झाली तर ज्ञानी पुरुषाला एक तुच्छ वस्तु गेली असे वाटून क्लेश होत नाहीत. पण ती असली तर त्याला तिच्या द्वारा सर्व भोग-मोक्षसुख मिळतें. देह हा ज्ञान्याचा रथ आहे असे म्हणतात. कारण तो त्यात बसून सर्व भोग व मोक्ष याकरिता ससारात यथेच्छ फिरतो. शब्द, स्पर्श रूप, रस, गंध, बाधव, संपत्ति इत्यादि सर्व या शरीरनगरीच्या योगानेच मिळत असते. म्हणून ती ज्ञान्यास लाभदायिनी वाटते. ही सुख, दुःख, क्रिया इत्यादिकाचा भार वहात असते; म्हणून सर्वज्ञाला आवडते. ___ असो; अशा प्रकारच्या शरीरनगरीत राज्य करणान्या ज्ञान्याला पीडा न होता तो अमरावतीतील इंद्राप्रमाणे त्यात सुखाने राहतो, तो आपल्या मनोरूपी मत्त घोड्याला-कामाचा विषय-अशा योनिरूपी खड्ड्यात पाडीत नाही. तो लोभरूपी विषवृक्ष घेऊन आपली प्रज्ञाकन्या देऊन टाकीत नाही. अज्ञानरूपी परराष्ट्राला त्याचे लहानसेंही छिद्र दिसत नाही. तो ससारशत्रूची भीति समूळ नाहीशी करून टाकतो. काम व भोग हेच ज्यामध्ये मोठे थोरले मकर आहेत अशा तृष्णारूपी नदीच्या दुःखदायी भोवऱ्यात तो बहिर्मुख होऊन पडत नाही. तो अंतर्बहिः परमा- त्म्यालाच पहात असल्यामुळे मानस ब्रह्माकार वृत्तीचा आधार घेऊन सतत आधिभौतिक व आध्यात्मिक नदीसंगम-तीर्थावर स्नान करितो. विषयसु. खापासून पराड्मुख झालेला तो सर्व इद्रियरूपी लोकाच्या दृष्टी न पड- णान्या ध्याननामक अतःपुरात सुखाने रहातो. म्हणूनच ही नगरी ज्ञानी पुरुषाला सुखावह होते. अहो, जी नगरी असली तर सर्व आहे व जी नष्ट झाली तर काहीएक नष्ट झाले नाही ती सुखावह कशी नव्हे ! घागर फुटली असता त्यांतील आकाशाला ज्याने आपल्या स्वरूपांत घेतले आहे अशा आकाशाची कोणती हानि होणार ? स्थितिकालीही ज्ञान्याला ज्याचा स्पर्श होत नाही त्याचा नाश झाल्यावर स्पर्श कसा होणार? या शरीरनगरात राहून ज्ञानी प्रारब्ध प्राप्त कल्पित भोगाचा स्वाद घेतो व पूर्ण ब्रह्माचाही साक्षात् अनुभव घेतो. व्यवहारदृष्टया सर्व करीत असला तरी पारमार्धिक दृष्टया कांहीं न करणारा ज्ञानी कदाचित् सर्व कर्तव्य व्यवहार करतो. ज्याची गति कोठेही कुंठित होत नाही अशा सुंदर, निर्मल व चंचल