पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ बृहद्योगवासिष्टसार. भाग्यच आहे व अशा पुरुषास उपदेश केल्यानेच ज्ञान, शास्त्रार्थ व शिक्षकाची कुशलता ही सफल होतात. असे बोलून गाधिपुत्र विश्वामित्र स्वस्थ बसला असता व्यास, नारद इत्यादि मुनी " ठीक, ठीक फार उत्तम, फार चागले," असे म्हणून त्याच्या म्हणण्यास अनुमोदन देऊ लागले तेव्हा राजाच्या अगदी जवळ बमलेला ब्रह्मपुत्र वसिष्ठ म्हणाला----हे मुने, मला जे करण्याविषयी सागत अहा ते मी निर्विघ्नपणे करीन. कारण सज्जनान्या आज्ञेचे उल्लघन करण्यास कोण ममर्थ आं: ' मी रामचद्रादी राजपुत्राच्या अंत करणातील मोहास ज्ञानाच्या प्रकागाने नाहीमें कम्न सोडितो पूर्वी निषध पर्वतावर ब्रह्मदेवाने जे काही सागितले होते ते सर्व माझ्या ध्यानात आहे असे बोलून जेव्हा तो महात्मा वसिए मुनि माडी घालून उपदेश करण्यास तयार झाला त्यावेळी त्याच्या मुखावर वक्त्याचे एकप्रकारचे तेज चमकू लागले, आणि सर्व सभा शांत होऊन आपले भाषण ऐकण्यास उत्सुक झाली आहे, असे पाहून त्याने बोलण्यास आरभ केला २. सरी ३-या सात, रामाच्या शकेचे निरसन करण्याच्या मिषाने, स्थूल-सूक्ष्म जगाचा आरोप व अपवाद याच्या द्वारा श्रीवसिष्ट प्रत्यक-चिदात्मा हा या प्रथाचा प्रतिपाद्य विषय आहे, असे सुचवितात श्रीवासिष्ठ-बा रामा लोकास शातीचा लाभ व्हावा या उद्देशाने सृष्टीच्या आरंभी भगवान् कमलोद्भवाने जे ज्ञान सागितले होते, तेच मी आता तुला सागतो. चित्त स्थिर करून माझे झणणे ऐक. किंवा तुला काही विचारावयाचे असल्यास ते तू अगोदर विचार. ब्रह्मनिष्ठ गुरूचे हे प्रेमळ शब्द ऐकून रामभद्र विनयाने हात जोडून ह्मणाला-गुरुवये, आपण अगोदर माझ्या एका सशयाचे निवारण करा. सवज्ञ व अति बुद्धिमान् असे व्यासमुनि शुकाचे गुरु व जनक असूनही ते विदेह मुक्त झाले नाहीत व न्याचा पुत्र विदेह मुक्त झाला याचे कारण काय ? __ हा प्रश्न ऐकताच,-जोपर्यत याला बध, अविद्येमुळे उत्पन्न झालेला आहे हे, व अविद्येचे आणि साक्षी चैतन्याचे स्वरूप समजलेले नाही, तोपर्यंत जीवन्मुक्तीवर याची श्रद्धा बसणार नाही. यास्तव अगोदर त्यास त्याचे ज्ञान करून देऊन नतर या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. असा विचार करून श्रीवसिष्ठ ह्मणाले-बा सज्जना, या परमात्म्यामध्ये अणुरेणूसारखी भास-