पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५५० बृहयोगवासिष्ठसार. श्रीवसिष्ठ-रामा, ज्ञानी पुरुषाला ही नगरी रम्य, सर्व गुणसंपन्न व अनेक विलासानी युक्त आहे असे वाटते. भात्मजोतीरूपी सूर्याच्या प्रकाशाने ती सतत प्रकाशित झालेली असते. तिच्या नेत्ररूपी खिड- क्यात ठेवलेल्या इंद्रियरूपी दोन प्रदीपाच्या योगाने दुसरी भुवनें त्या नगरीत प्रकाशित होतात. दोन हात हेच तिच्यातील दोन मोठे मार्ग असून त्यांच्या द्वारा गुडघ्यापर्यंत येऊन पोचल्यावर त्याच्यापुढे पादरूपी नगरीच्या जवळचे जंगल सुरू होते. शरीरावरील रोमपक्ती ह्याच त्यांतील लता व गुल्म होत, त्वचेतील शिरा ह्याच त्यातील जाळ्या आहेत; माड्या हेच त्यातील स्तभ, रेखा याच सीमा, उपस्थ हीच नदी, कस हीच वर्ने, मुदर भुवया, ललाट, ओंट यानी मुक्त असलेलें मनोहर मुख हेच उद्यान, कटाक्षरूपी नील कमलांनी भूपित झालेले गाल हीच त्यांतील मैदाने व वक्षःस्थल हेच तिच्यांतील रम्य सरोवर असून त्यात स्तनरूपी कमळाचे कळे आले आहेत. खालून ( तृणस्थानीय ) दाट केसानी अच्छादित झालेले खांदे हेच जिच्यातील क्रीडापर्वत आहेत, उदर हेच जिच्यातील कोशागार असून त्यांत भरलेली प्रारब्ध प्राप्त अन्न हीच जिच्यातील विविध धनें आहेत दीर्घ व ऊर्ध्व-मुखयुक्त असलेले जे कठबिल त्यातून येणाऱ्या प्राणवायूचा जिच्यामध्ये शब्द होत आहे; हृदयरूपी बाजारात बसलेल्या विचाररूपी रत्नपारखी-पुरुषानी परीक्षण करून घेतलेल्या व नेत्रादिकांच्या द्वारा आलेल्या विषयाच्या वासनारूपी मालाने जी भरलेली आहे; जिच्या नऊ दारातून प्राणापानादि वायुरूपी नागरिक जन एकसारखे जात-येत आहेत; मुखातील विरल दातांची राग हीच जिच्या मुख्य द्वारावरील हस्तिदती वेलबुट्टी आहे; मुखरूपी मदिरात सर्वतः भ्रमण करणान्या जिहारूपी कालीकडून ज्या नगरीत भक्ष्य-भोज्यादि चतुर्विध पदार्थाचा स्वाद घेतला जात असतो; रोम हेच जिच्यातील नुक्तेच उगवलेले गवत आहे, कानांची छिद्रे हेच जिच्यातील कूप (भाड, विहिरी ) आहेत; चित्त हीच ज्यातील उद्यानभूमि असून यांत आत्मचिंता ह्याच फिरणाऱ्या श्रेष्ठ स्त्रिया आहेत, ज्या शरीरनगरांत चपल इंद्रियें हीच माकडें बुद्धिरूपी दोरीने बाधून ठेविली आहेत आणि वदनरूपी उद्यानांतील हास्यरूपी पुष्पांच्या योगाने जी मनोरम झाली आहे, अशी सर्व सौभाग्यसुंदरी नगरी तत्त्वज्ञाच्या सुखालाच कारण होत. तिच्यापासून त्याला दुःख कधीही होत नाही. त्या नगरीचा आश्रय करून