पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४८ बृहद्योगवासिष्ठसार. मोठाल्या लाटा यांच्या योगानें क्षुब्ध झालेल्या नद्या वर्षाकाळ निघून गेल असता जशा क्षीण होतात, त्याप्रमाणे ज्याच्या तृष्णानद्या उत्तरोत्तर क्षीण होत जाऊन शेवटी शांत झाल्या आहेत; उंदरानें तोडलेल्या पक्ष्यांच्य जाळ्याप्रमाणे ज्याचे संसारवासनाजाळ तुटले आहे आणि वैराग्याच्या वेगाने ज्याची हृदयप्रथी शिथिल झाली आहे, त्याचे मन, कतकवीजाच्या योगाने जल जसें प्रसन्न होते त्याप्रमाणे अति प्रसन्न होते. कामनारहित, विषय गुणानुसंधानशून्य, भार्यादि परिग्रहरहित आणि पुनः पुनः भोगलाभभूमीच त्याग करणारे मन, जिन्यांतून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे, मोहांतून पा निधन जाते. नतर सदेह-दौरात्म्य शात झाले असतां व कौतुकभ्रम ना झाला असतां परिपूर्ण झालेले चित्त, पूर्ण चंद्राप्रमाणे, शोभते. वायु शार झाला असता समुद्र जसा सथ होतो, त्याप्रमाणे वासनाशून्य चित्तांत सुदर समता उत्पन्न होते. प्रसिद्ध सूर्योदयामुळे क्षीण होणान्या रात्री प्रमाणे चित्सूर्योदयाच्या योगाने ससारवासना क्षीण होते. प्रातःकाळ प्रफुल्लित झालेल्या कमळिनीप्रमाणे चित्त निर्मल झाले असता हृदयंगा प्रज्ञा उत्पन्न होतात आणि पूर्ण चंद्राच्या किरणाप्रमाणे त्या सात्विक प्रज्ञ ( बुद्धी) त्रिभुवनास आहाददायी होतात व उत्तरोत्तर वाढत जातात. राघवा, तूं ज्ञानी आहेस. महा बुद्धिमान् आहेस. यास्तव तुला काह फार सांगावयास नको. वायु, तेज इत्यादि चार भूतानी रहित असलेल्य आकाशकोशाप्रमाणे सृष्टीतील काहीएक उत्पन्न होत नाही व नाश पावर नाही. ज्याला आत्मज्ञान झालेले असते त्याला उत्पत्ति, स्थिति, लय विविध अवतार इत्यादि प्रपंचांत पडून दुःखी होणाऱ्या ब्रह्मा-विष्णु इंद्र-शकर-इत्यादिकाचीही दया येते. ज्याचे चित्त निरहंकार आहे अश भात्मज्ञास पुनः कधी विकल्प होत नाहीत. तरंगाप्रमाणे हे जीव आपल्या चित्तवासनेमुळे सृष्टीत येतात व जातात, असा खरा प्रकार असल्यामुळे जन व मरण हे भाव अज्ञाप्रमाणे ज्ञानी पुरुषाला आसक्त करीत नाहीत. आत्म ज्ञाला देह भूषित झाला तरी व दूषित झाला तरी त्याविषयों काही वाटर नाही. विवेकानें वासना क्षीण होते, हे वर सांगितलेच आहे. मी कोण हे कार आहे? याचा जोवर विचार केला नाही तोवर हे संसाराडंबर अंधकाराप्रमाणे असेंच राहणार. मिथ्या भ्रमामुळे उद्भवलेलें हैं शरीर आपत्ताचे स्थान आहे असें जाणून व त्याच्यावरील साक्ति सोडून आत्मभावाने जो त्याल