पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग २२. ५४७ पास्तव, हे रामा, सर्व पदार्थरूप संकल्प सोडून तूं स्वाभाविक आत्ममावाने स्थत हो. अद्वय आनंदरूप हो. क्षाणिक दुःखमय होऊ नकोस. _ 'गुरुराज, संकल्पांसह द्वैतभावांचा त्याग जरी केला आणि त्यांच्याविषयी पुनः इच्छा जरी न केली तरी, आरशामध्ये प्रतिबिब जसे त्याच्या इच्छे- वरुद्ध पडते त्याप्रमाणे, ते भाव मजमध्ये व्यक्त होतात' म्हणून म्हणशील तर सागतों-आरसा जड असल्यामुळे तो प्रतिबिंबाचे निवारण करू शकत नाही. पण तू जड नाहीस. चेतन आहेस. चित्तामध्ये जगाचे पतिबिंब पडूं नये असें मनात आणल्यास तू त्याचे निवारण करण्यास समर्थ आहेस. चित्ताचा निरोध कर की, जगाचा गंधही तुझ्या अनुभवास णार नाही. आणि कदाचित् चित्तनिरोध शिथिल झाल्यावर त्याचा मनुभव आल्यास तें मिथ्या आहे, असें अनुसधान करून तूं तद्रूप होऊ कोस. अथवा त्याच्या अनुभवसमयाही चिदैक्याचे अनुसधान कर. गातील पदार्थीस चित्ताचे आकर्षण करूं देऊ नकोस. त्याचे वारवार उनुसंधान करूं लागल्यास ते चित्ताला ओढून नेल्यावाचून राहणार नाहीत. तात्मानुसंधान सोडून चित्ताने त्याच्या ठिकाणी अनुरक्त होणे यासारखी सरी कोणतीही हानि नाही २१. सर्ग २२-ज्याचा बोध चागला रूढ झाला आहे त्या चित्ताचे सर्व दोष क्षीण तात; ते प्रसन्न होते व त्याला मुशुद्ध आत्म्याचे दर्शन होते. श्रीवसिष्ठ--रामा, ज्याने विचार केला आहे, ज्याचें वृत्तिज्ञान क्षीण लें आहे, समाधीच्या अभ्यासाने ज्याने क्रमाने बाह्य व आंतर मनन डले आहे, त्यामुळे ज्याचे मन विश्राति घेत आहे, त्याज्य जगाचा त्याग रून जो ग्राह्य ज्ञानभूमिकाचा स्वीकार करीत आहे, सर्व दृश्य चिन्मात्र हे असें जाणून जो भ्रामक चित्-हून निराळं काही पाहत नाही, जो (तत्त्वाविषयी जागरूक राहून भयंकर संसार-मोहमार्गाविषयीं गाढ झोप घेत सतो (म्हणजे त्याला त्याचे भानही नसते). भोगापर्यंतच रम्य वाटणारे र्गादि-ब्रह्मलोकान्त सरस व ऐहिक अरस विषयाविषयीं जो अत्यंत विरक्त ला आहे आणि त्यामुळेच लोकसंग्रहार्थ केलेल्या कर्माच्या फळाविषयी व रब्ध-प्राप्त भोगांविषयी जो निराश झाला आहे, जो मिठाच्या खड्याप्रमाणे [त्मरूप जलाशी तादात्म्य पावला असून, ज्याचे अनादि भज्ञानाकाश, हात ठेवलेल्या बर्फाच्या तुकड्याप्रमाणे, गळून गेले आहे; तरंग ।