पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ बृहद्योगवासिष्ठसार. (संसारमदिरा) आपोआप उत्पन्न झाली आहे. केवळ संकल्पांचा त्याग केल्यानेच ती क्षीण होत असते. श्रवण-मननरूप विचार व समाधीकरितां दृद्ध अभ्यास याच्या योगाने सर्व पदार्थीविषयींचा असग स्थिर होतो. सत्य दृष्टि प्राप्त होऊन असत्याचा क्षय झाला असता निर्विकल्प व निर्मल चिद्रूप भात्मा प्राप्त होतो. तो व्यक्त आहे की अव्यक्त आहे हे कळत नाही आणि सुखरूप आहे की दुःखमय आहे, याचा निर्णय होत नाही. तर त्याच्या आंत केवल केवलीभाव आहे, असा अनुभव येतो. अनर्थकारक देहाभि- मानाने त्याची प्राप्ति होत नाही. यास्तव देह, इंद्रियें, मन, अनंत वासना इत्यादि सर्वांहून भिन्न असलेल्या पण रज्जुसर्पन्यायाने तद्रूप झालेल्या मात्म्याला पृथक्-रूपाने जाणून कल्पित बधापासून मुक्त करावे, अविद्या- वेष्टित आत्म्याच्या कल्पनेनेच त्याला संसारित्व प्राप्त झाले आहे. यास्तव कल्पनात्याग केला म्हणजे परम पुरुषार्थरूप सुख अवशिष्ट राहते. शून्य प्रदेशी सिह आहे किवा भूत आहे, अशी कल्पना उठताच जसें हृदयासह शरीर थरथर कापू लागते, त्याप्रमाणे शून्य शरीरात मी बद्ध आहे असे वाटतांच तो बद्ध व त्यामुळे भयभीत होतो. पण त्या शून्य प्रदेशी सिंह किंवा पिशाच खरेच आहे की काय म्हणून विचारपूर्वक पाहू लागल्यास त्याला जसे काही दिसत नाही, त्याप्रमाणे संसारबध हा काय पदार्थ आहे म्हणून विचार करू लागल्यास त्याचे काही स्वरूप दिसत नाही. हे जगत् व हा मी हे दोन्ही भ्रम आहेत. कारण जगांतील कोणताही पदार्थ अथवा स्थिति स्थिर नाही. पदार्थ असता असतां नाहीसा होतो. आणि प्राण्याची बरी-वाईट स्थिति हा हा म्हणता बदलते. एका क्षणात रकाचा राव व रावाचा रक होतो. आलिंगन देणाऱ्या मातेच्या ठायीं पत्नीचा भाव ठेवल्यास ती सुरतानंदाच्या द्वारा पत्नीचे कार्य करू शकते, पण तेंच, मालिंगन देणाऱ्या भार्येलाही माता मान- ल्यास तिच्या स्पर्शानेही चित्त विकारयुक्त होत नाही. अर्थात् जगांतील पदार्थ प्राण्यास भावाप्रमाणे फल देतात. चित्त जशी भावना करते तसे त्याला फळ मिळते. सृष्टीत सत्य नाही असेंही काही नाही माणि असत्य नाही असेंही काही नाही. तर ज्याच्या त्याच्या दृष्टीप्रमाणे सर्व सत्य व सर्व भसत्य आहे. प्रत्येकाच्या निर्णयाप्रमाणे त्याला प्रत्येक वस्तु दिसते.