पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ स्थितिप्रकरण-सर्ग २१. १.५ ज्यांच्या मनांतही भरवून देते. वेदातवेत्ते हे सर्व ब्रह्म आहे या रूढबुद्धीने निर्णय करून मुक्ति झणजे सर्वअनर्थनिवृत्ति व निरतिशय आनंदरूप अपरिछिन्न ब्रह्मात्मभावप्राप्ति होय, असे म्हणतात आणि ती आम्ही सांगतो त्या उपायांनीच प्राप्त होईल. दुसन्या कोणत्याही रीतीने प्राप्त होणार नाही, असे आपल्याच मताविषयी निश्चित होऊन आपले नियम-भ्रम भापल्या अनुयायींस सागतात. (म्हणजे त्याचे उपेय तत्त्व जरी वास्तव असले तरी उपायप्रक्रिया कल्पितच आहेत.) विज्ञानवादी बौद्ध, आप- ल्याच भ्रमपूर्ण बुद्धीने मुक्ति शम-दमादिकाच्या योगानें प्राप्त होते असे समजून तसेच दुसन्याना शिकवितात. तात्पर्य जैनादि इतर विचारीही आपल्या इच्छेप्रमाणे विचित्र कल्पना करितात. ह्या नाना आकाराच्या कल्पना जलावर कारणावाचूनच उद्भवणान्या बुडबुड्याप्रमाणे आपल्या निश्चित मतीपासून उद्भवत असतात. पण त्या सर्वांची खाण मनच होय. अभ्यासामुळे कडू लिवही कडू लागत नाही आणि ऊस गोड लागत नाही. अभ्यासामुळेच चद्रमडलात राहणाऱ्या प्राण्याना चंद्र शीतळ वाटत नाही आणि सूर्यमडळातील लोकास सूर्य उष्ण वाटत नाही. तात्पर्य ज्याचा परम अभ्यास झाला असेल तेच सत्य व हितकर आहे, असे भासू लागते. यास्तव राघवा, पुरुषांनी अकृत्रिम आनंदाकरिता प्रयत्न करावा. मनाला आनंदमय करावें. म्हणजे तो मिळेल. दृश्याचे परिमार्जन करून भानंदाचे अनुसंधान करूं लागले असता दृश्यापासून उद्भवणाऱ्या सुख-दुःखाचा अनुभव येत नाही. सुखदुःखें मनाला आकर्षण करू शकत नाहीत. दृश्य अपवित्र, असद्रूप, मोह पाडणारे, भयकारण व बद्ध करणारे आहे. पास्तव त्याची भावना करूं नकोस. दृश्य हीच ईश्वराची माया व दृश्य हीच भयावह भविद्या आहे. संविद्ने दृश्यरूप होणे हेच पूर्वोक्त क्रमाने उद्भवणारे बंधक कर्म होय. मन दृश्याच्या सौदर्यामध्ये भासक्त झाले की, में मोह पाड लागले आहे, असे समज व तत्काळ त्या महामलिन चिख- गचा परिहार कर. ही जी स्वाभाविक दृश्यतन्मयता अनुभवास येते तेलाच ज्ञानी अविद्या-संज्ञक संसारमदिरा म्हणतात. बांधळ्याला जसा पूर्यप्रकाश लाधत नाही, त्याप्रमाणे तिच्या सेवनाने मत्त झालेल्या लोकांचे. ल्याण होत नाही. संकल्पामुळे उद्भवणान्या आकाशवृक्षाप्रमाणे. ती