पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४४ बृहद्योगवासिष्ठसार. मनामुळेच जनतेचा जन्म झाला आहे. यास्तव सुव्रता प्रथम त्याचेच स्वरूप चागले समजून घे. मालिन्य सर्व अज्ञ पुरुषांच्या अनुभवाने सिद्ध भाहे. त्याच उपाधीच्या योगाने चित् विकार पाऊं लागली म्हणजे प्रकृति होते. मनन करूं लागली ह्मणजे मन होते. पाहूं लागली झणजे नेत्र होते व ऐकू लागली झणजे श्रोत्र होते. त्याचप्रमाणे कर्मेंद्रियरूपास प्राप्त होऊन त्यांच्या व्यापाराने धर्म व अधर्म-संज्ञक कर्मही ती चित्च स्वतः होते, असे ममक्षंनी श्रुत्यादि प्रमाणांवरून ठरविले आहे. अनेक वादी शास्त्रकारानी आपापल्या इच्छे- प्रमाणे तिच्याच अनेक नावाची रूपाची, व आकाराची कल्पना केली आहे. मननामुळे चचल झालेले मन ज्या ज्या भावाचे ग्रहण करते त्या त्या भावास ते प्राप्त होते. सुगधी पुष्पावरून येणारा वायु जसा सुगधमय होतो त्याप्रमाणे ते तन्मय होते. यास्तव आत्म्याचा निर्णय करून मनाला तन्मय करून सोड, वारवार त्याचाच आस्वाद घे. मन तन्मय झाले की त्याच्या अधीन असलेले शरीरही तन्मय होईल. मनाच्या प्रेरणेनेच शरीर, ज्ञानें- द्रियें व कर्मेद्रिये याचा क्रमाने व्यवहार सुरू होत असतो. त्यामुळे वस्तुतः सर्व कर्म मनाचे आहे. पुष्प व त्याचा वास याची सत्ता जशी एक त्या- प्रमाणे मन व कर्म याची सत्ता एक. दृढ अभ्यासामुळे मन ज्या ज्या भावाचा स्वीकार करते त्या त्याप्रमाणेच पुढे वासना, कर्म व फलानुभव याचा विस्तार होतो व त्याचाच आस्वाद घेऊन तत्काल तें बद्ध होते. ते ज्या ज्या भावाचा स्वीकार करतें तें तेंच खरें व तत्त्व आहे, असा त्याचा दृढ निश्चय होतो व तेंच श्रेयस्कर आहे दुसरे काही नाही असें त्याला वाटते. याच अबाधित नियमास अनुसरून प्रत्येक मन धर्म, अर्थ, काम अथवा मोक्ष यातील कोणत्या तरी पुरुषार्थाकरिता प्रयत्न करिते. कापिलाचे (साख्याचे ) मन असग व चिन्मात्र त्वपदार्थाला मात्र आपल्याच विवेक- शक्तीने जाणते व तत्पदार्थाविषयीं श्रुतींचा आश्रय न केल्यामुळे मोहित होते. त्यानी आपल्या बुद्धीनेच सुख-दुःख-मोहात्मक जड जगाचे उपादान तसलंच त्रिगुणात्मक प्रधान असले पाहिजे असे समजून, पुनः पुनः त्याचाच आखाद घेऊन, तेच तत्त्व जाहे असा निर्णय करून, तशाच शास्त्रदृष्टींची कल्पना केली आहे. ते त्याचे मन 'या आमच्या सिद्धांताप्रमाणे विचार केल्यावाचून कोणालाही मोक्ष मिळणे शक्य नाही' असें ग्रंथद्वारा दुस-