पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण सर्ग २१, ५४३ पुरुष असता तर शुक्र विविध आकार व शेकडों जन्मांतर-भ्रम यांस कसा प्राप्त झाला असता ? तस्मात् चित्तच पुरुष असून शरीर चित्तवि- षय आहे. चित्त ज्या रूपाचे होते तेंच त्याला सत्वर प्राप्त होते, यांत काही संशय नाही. यास्तव सज्जना, जें अतुच्छ, अनायास, अनुपाधि ब भ्रमरहित तत्व आहे त्याचे मोठ्या यत्नानें अनुसंधान कर. मणजे तूं तद्रूप होशील. मनाने इच्छिलेल्या देशामध्ये अथवा विषयामध्ये शरीर व इंद्रिय नियमाने जातात. पण शरीर जेथे असेल तेथें मन रहातेंच असा काही नियम नाही. तर शरीर शिवालयात असताना मन अमंगल जागीही जाते. यास्तव आपले इष्ट संपादन करण्याकरिता मन, शरीर व इंद्रिये, यांचे निय- मन करण्यास समर्थ आहे. यास्तव तुझें मनही सत्य आत्मतत्त्राकडे लागो. भनित्य देहादिकाकडे त्याचा कल न होवो २०. ___ सर्ग २१-विशुद्ध अवस्थेत कल्पना करणाराच नसल्यामुळे मन कल्पना सभवत नाही पण अशुद्ध अवस्थेत मनाची सिद्धि होऊन नाना मत-कल्पना सभवतात. श्रीराम हे सर्वधर्मज्ञ भगवन् , सागरांतील कल्लोलाप्रमाणे माझ्या मनांत हा एक मोठा संशय आहे. दिशा, काल इत्यादिकानी मर्यादित न होणाऱ्या व त्यामुळेच नित्य व निरामय अशा ब्रह्मामध्ये ही मन या नावाची संवित् कोठून अथवा का उत्पन्न झाली ? ज्याच्यामध्ये त्रिकाली दुसरें ह्मणन काही नाही त्याच्यामध्ये, हा कलंक का, कसा व कोणत्या प्रकार रहातो? श्रीवसिष्ठ-रामा, चागला प्रश्न केलास. मनोहर परागाचा स्त्राव करणान्या नंदनवनातील मजिरीप्रमाणे तुला मोक्षभागिनी मति उत्पन्न झाली आहे. तुझी मति पूर्वापर-विषयांत तत्पर झाली आहे. यास्तव शंकरादिकांस प्राप्त झालेले उच्च स्थान तुला मिळेल. पण रामा, तुझ्या या प्रश्नाचा हा काल नव्हे. मी जेव्हा सिद्धात सागेन तेव्हां तूं हा प्रश्न कर. ह्मणजे मी सागितलेला सिद्धांत तुला तळहातावरील आंवळ्या प्रमाणे साक्षात् कळेल. वर्षासमयीं मोराच्या केका व शरदृतूंतच हंसवाणी शोभते. पावसाळा संपला झणजे आकाशाची स्वाभाविक नीलिमा व पावसाळ्यांत मोठमोठ्या ढगांनी आच्छादित झालेले आकाशच नेत्रांना आनंद देते. सारांश, सर्व काही योग्य काळी झाले पाहिजे. या वेळी उत्तम मनोनिर्णय चालला आहे.