पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४० बृहद्योगवासिष्ठसार. च्या योगाने तो स्वाभाविकपणेच बद्ध झाला होता. भोळ्या जीवसंवित्-ला जसे संस्कार करावे तशी ती होते. यास्तव तिला वास्तव ब्रह्मभावानेच सुसस्कृत करावे. मिथ्या जीवादि भावाने संस्कृत करूं नये. श्रीराम-मुनिराज, जाग्रत् व स्वप्न यामध्ये भेद कोणता आहे ? विषयांचा साक्षात् अवभास दोन्ही अवस्थामध्ये एकसारखाच होतो. मग जाग्रत् सत्य आहे व स्वप्न भ्रम आहे असा व्यवहार का होतो? श्रीवसिष्ठ-राघवा, स्थिरप्रतीतियोग्यता हीच जाग्रत् व अस्थिर प्रत्यः हेच स्वप्न, जाग्रत्-अवस्थेत पुन पुनः तोच तो पदार्थ अनुभवास येतो हेच तो सत्य आहे, असें ह्मणण्याचे कारण आहे. स्वप्नात पाहिलेला पदार्थ जर अन्य काळी दिसू लागला तर ते स्वप्न जाग्रत् होईल व जाग्रत्-वस्तू चाही अन्य काळी अनुभव जर न आला तर ती जाग्रतीही स्वप्न होईल. जाग्रत् व स्वप्न या दोन अवस्थाचा भेद स्थिरता व अस्थिरता यावाचून नाही. पण त्याचा अनुभवाश सदा सर्वदा सारखाच असतो. स्वप्नही स्वप्नाच्या वेळी स्थिर असल्यामुळे तेवढ्या वेळेपुरते जाग्रत्च असते व जाग्रत्-समयींही जे अस्थिर असते किवा अस्थिर आहे अस कळते तें स्वप्नच होय. हरिश्चद्राच्या बारा वर्षाच्या स्वप्नाप्रमाणे ज्या स्वप्नाचा स्थैर्याश जाग्रबुद्धिग्राह्य असता ते स्वप्न जाग्रतच होय. जोपर्यत जे स्थिर आहे असे वाटते तोपर्यंत ते जाग्रतच. पण क्षणात नष्ट होणारे सर्व स्वग्नतुल्यच कसे ते आता सागतो ऐक. ज्याच्या योगाने प्राणी जिवत रहातो तो जीव-धातु शरीरात असतो. ( अर्थात् जीवन हेच त्यान्या अस्तित्वाचे प्रमाण.) तेज व वीर्य (ह्मणजे शरीरातील रज्मा व शरीराच्या चेप्टेम कारण होणारें बन्द ) हे त्याचे लिग होय. त्याचप्रमाणे निरूपावि प्रेम, अभिमानाचे निमित्त ज्ञान इत्यादिवही जीवधातूचे चिह्नच होय. शरीर जेव्हा मनाने, वाणीने अथवा कमोने व्यवहार करू लागते तेव्हा प्राणवायूने ज्याला प्रेरणा केली आहे असा जीव-धातु, पाटातून वहात बाहेर पडणान्या सरोवर-जलाप्रमाणे हृदयांतून बाहेर पडून सचार करू लागतो. तो सचार करू लागला ह्मणज अगांतील सर्व नाड्यांमध्ये संवित् (ज्ञान) उत्पन्न होते व ती दृष्ट असल्यामुळे चित्तरूप ोते. तिच्यामध्ये जगत-भ्रम लीन असतो. नेत्रादि गालकांमध्ये पसरणारी ती सवित् नाना आकार व विकार यांनी संपन्न