पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग १९. रामा, याप्रमाणे जीवांचा परस्परसंबंध होतो. केळीच्या पानाप्रमाणे एकांत एक एकात एक, असे अनेक जीव उद्भवतात. दृश्यबुद्धि परावृत्त झाली, (ती अंतर्मुख झाली ) ह्मणजे आतर व बाह्य वस्तूचे तात्विक ज्ञान होते. बाह्य असार आहे, असे कळल्यामुळे त्याचा बाध होतो. मी कोण व हे काय आहे असा विचार ज्याला होत नाही त्याचा हा दीर्घ जीवभ्रम नाहीसा होत नाही. वैराग्यपूर्वक विचार केला असता तो सफल होतो. ज्याची भोगतृष्णा क्षीण झालेली नसते त्याचा विचार निष्फल आहे. पण अध्यात्म शास्त्रांचे सतत चितन केल्यास भोगतृष्णा प्रतिदिन क्षीण होत जाते व शेवटी त्या मतिमानाचा विचार सफल होतो. पथ्यादि नियमपूर्वक घेतलेले औषध जसें रोगाला घालविते त्याप्रमाणे इंद्रियास जिंकण्याचा अभ्यास केला असता विवेक सफळ होतो. विवेकही ज्याच्या केवळ वाणीमध्येच असून मनात नसतो त्याची अविवेकिता जात नाही, तर ती दुःखालाच कारण होते. ज्याप्रमाणे स्पर्शाने वायूची सत्ता कळते, केवळ वाणीने कळत नाही, त्याप्रमाणे इच्छेच्या न्यूनतेवरून पुरुषाचा विवेक कळतो, नुस्त्या शब्दावरून कळत नाही. चित्रातील अमृत हे खरे अमृत नव्हे, चित्रातील अग्नि हा खरा अग्नि नव्हे व चित्रातील अगना ही खरी अंगना नव्हे. त्याप्रमाणे केवल वाणीतील विवेक हा अविवेक होय. विवेकाच्या योगाने प्रथम राग ( आसक्ति) क्षीण होतो. वैर समूल नाहीसे होते व नतर इष्टप्राप्ति व अनिष्टनिवृत्ति याविषयींचा प्रयत्न सर्वथा क्षीण होतो. तस्मात् ज्याच्या ठायी विवेकिता असते तोच पावन पुरुष होय १८. सर्ग १९-उपासनेप्रमाणे फलप्राप्ति, बोवाने सत्य आत्म्याची स्थिर सिद्धि, जाग. रादि चार अवस्थाची स्थिति. श्रीवसिष्ठ-रामा, जीवाचे बीज पर ब्रह्म आहे. ते आकाशाप्रमाणे सर्वत्र स्थित आहे. त्यामुळे जीवामधील जगातही अनेक जीव असतात. केळीच्या पानाप्रमाणे अथवा पृथ्वीतील किड्यांप्रमाणे जीवामध्ये अनेक जीव- जाती असतात, स्वात्मसिद्धीकरितां जीव जसे जसे प्रयत्न करतात, तसे तसे, विचित्र उपासना क्रमानें, तत्काल होतात. देवांची पूजा करणारे देवांस जाऊन पोचतात, यक्षाचे पूजक यक्षास प्राप्त होतात व ब्रह्मपूजक ब्रह्मरूप होतात. यास्तव यातील जे तुच्छ नसेल तें ध्यावे. आपल्या निर्मल ज्ञानानें शुक्र मागून मुक्त झाला व प्रथम दृष्टी पडलेल्या अप्सरारूप दृश्या-