पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग १८. ५३७ आत्मज्ञानहीन व देहच आत्मा आहे या वासनेनें वासित असतो. झणजे त्याची सुषुप्ति वासनाबीजयुक्त असते व ज्ञानी पुरुषाची सुषुप्ति वासना- शून्य असते. हाच काय तो त्याच्यामध्ये फरक आहे व त्यामुळे एक संसार- भाक् व दुसरा मुक्तिभाक् होतो. चित् सर्वगत असल्यामुळे एकाला दुस- याच्या सर्गात प्रवेश करिता येतो. त्यामुळेच प्रत्येक सर्गात दुसरे अनेक सर्गही पृथक्पाने रहातात. केळीची सोपटे जशी एकात एक असतात त्याप्रमाणे सर्गाचे समूहही एकात एक, एकांत एक असे असतात. पण ब्रह्म सर्वामध्ये एकरूपाने रहाते. केळीच्या पानान्या मंडपाप्रमाणे ब्रह्मस्वभाव शी- तळ आहे. शेकडो पाने जरी आली तरी कदलीमध्ये काही अन्यता येत नाही. त्याप्रमाणे शेकडो सर्ग झाले तरी ब्रह्मामये अन्यता नाही. एकाद्या बीजाला जलाचे सहाय मिळाले असता ते अकुरादि क्रमाने पुनः फुलानंतर फळ. भावास ह्मणजे आपल्या स्वरूपास प्राप्त होते त्याप्रमाणे ब्रह्मही काम-कर्मादि रसाचा सपर्क झाला असता मन होऊन व जन्म-मरणादि कल्पनेने संसार करीत असताना ब्राह्मणादि अधिकारी शरीरास प्राप्त होऊन श्रवण-मन- नादि क्रमाने वोध झाला असता प्राक्तन ब्रह्मभावाने व्यक्त होते. पण एका बीजापासून क्रमाने झालेल्या दुसऱ्या बीजालाही भूमीत पेरून पाणी घातले असता त्याचाही जसा पुनः अकुरादिरूपाने परिणाम होतो तसा मुक्ता- लाही पुनः जीवभाव प्राप्त होईल, ह्मणून ह्मणशील तर बीजाबद्दल रसाचाच दृष्टात घे. ह्मणजे रस हे ज्याचे सहकारी कारण आहे असे बीज जसे फळभावाने परिणाम पावते त्याप्रमाणे ब्रह्म हे ज्याचे कारण आहे असा जीव जगपाने व्यक्त होतो. पण रस हा स्वाभाविक धर्म असल्यामुळे त्याचे कारण काय आहे ? असा प्रश्न करिता येत नाही. त्याप्रमाणेच ब्रह्माचे कारण काय आहे असे विचारता येत नाही. कारण ते स्वभावसिद्ध आहे. शिवाय निर्विकार, अद्वितीय व असंग असलेले ब्रह्म वस्तुतः प्रपं- चाचे कारणही होऊ शकत नाही व त्यामुळे त्याचे निराकै कारण शोध- ण्याचा प्रसगच येत नाही. कारण जे स्वतः अकारण आहे त्याचे आणखी कारण कसे असणार ? यास्तव जगत् अकारण ब्रह्माचे विवर्तरूप आहे आणि ह्मणूनच ते मिथ्या आहे. पण यावर-जड, अनृत व दुःखरूप जगाचे तसलेच कारण कोणते आहे? याचा विचार केला पाहिजे-ह्मणन झणशील तर सांगतों-असार वस्तूंचा विचार करून कोणता पुरुषार्थ मिळ-