पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३६ बृहद्योगवासिष्ठसार. होऊन घनरूप ( अवाढव्य आकाराचे) होतात. त्यांतील कित्येक अगदी निराळे रहातात, कित्येक लय पावतात व कित्येक परस्पर मिळून रहा- तात. रामा, या ब्रह्मसंज्ञक अरण्यांत एकेका अणूमध्ये परस्परास न मिळालेल्या अशाही असख्य जगद्गुजा आहेत. प्राक्तनामुळे त्यातील ज्याचा ज्यांच्याशी निकट संबंध येतो त्याच्या त्या जगाचा एक सघ होऊन त्यांच्याच मात्र व्यवहाराला तो साधारण होऊन रहातो. हीच गोष्ट उदाहरणाने स्पष्ट करू या. समज की, एके ठिकाणी दहा मनुष्य प्राक्तनकर्मामुळे जमली आहेत. त्यातील प्रत्येकाचे जग निराळे आहे. कारण त्यातील एकाला जशा प्रकारच्या जगाचा अनुभव येतो तशाच प्रकारच्या जगाचा अनुभव दुसन्याला येत नाही. एका कुटुबातील दोघा भावांच्या भार्या, त्या दोघींच्याही माहेरची माणसे व त्याचे सुख- दुःखादि भोग त्यातील प्रत्येक भावाला जरी प्रिय वाटत अमले तरी परस्परास अप्रिय वाटतात. आईला अनुकूल वाटणारा पदार्थ मुलाला प्रतिकूल वाटतो. तस्मात् प्रत्येकाचे जग निरनिराळे आहे, हे सिद्ध झाले. पण त्या दहाजणाचा ससर्ग झाल्यामुळे त्याच्या दहा जगाचा जणुं काय एक गोळा होतो व त्या कारणाने वस्तुमः साधारण नमतानाही तो एक साधारण पदार्थ आहे, असा भास होतो व त्या सर्वांची चित्ते एकसार- खीच मलिन असल्यामुळे त्याचा परस्पर ससर्ग होऊन एकाच्या दुःखार्ने दुसरे दुःखी व सुखाने सुखी होतात.) साराश हा सर्व भ्रम आहे, चित्त सर्व भेदाचे कारण आहे, चित्तामळेच जीवाचा परस्पर भेद झाला आहे. शुद्ध सोनेच आपल्याला विसरून कडे होऊन बसले आहे. सर्व जीवरा- शाच्या तिन्ही अवस्थाचा आश्रय आत्मा जाहे जागरादि तीन अवस्थांचे कारण जीव आहे, देह नव्हे. यास्तव जलच तरग आहे असे समजले असता तरंग जसे जलाइन पृथक रहात नाहीत त्याप्रमाणे जीवच तीन अवस्थाचा आत्मा आहे असा विचार केला ह्मणजे वस्तुभूत देहता अव- शिष्ट रहात नाही. अशारीतीनेच बद्ध ( तत्त्वज्ञ ) जीव तुर्यपदी रहाणान्या चैतन्य-एक-रस आत्मतत्त्वास प्राप्त होऊन जीवभावापासून निवृत्त होतो. पण जे तत्त्वज्ञ असतो तो आपल्याच कल्पनेने पुनः देहायाकार- कल्पनारूप सृष्टीत प्रवृत्त होतो. भज्ञ व ज्ञानी यांच्या सुषुप्तीत भेद मुळीच नसतो. पण त्यातील पहिला ( अज्ञ ) गाढ निद्रासमयीं वास्तव-