पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग १८. श्रीवसिष्ठ-रामभद्रा, या तुझ्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर क्रमाने देतो. शुद्ध मनाशी मिळून जाण्यास लागणारे सूक्ष्म सामर्थ्य ज्याच्यामध्ये नसतें तें मलिन मन दुसऱ्याशी मिळत नाहीं; हे जरी खरे आहे तरी औषधरस घालून द्रवमय केलेला सुवर्णादि धातु दुसऱ्या द्रवमय धातूशी जसा एक- रूप होऊन जातो त्याप्रमाणे शुद्ध मन दुसऱ्या शुद्ध मनाशी मिळून जाते. मलिन व शुद्ध जल एकत्र केल्यास त्यांचा परिणामही मलिन होतो. पण दोन निर्मल जलाचा सयोग केल्यास त्याचा एकजीव होतो की नाही? त्याचप्रमाणे शुद्ध चित्ततत्वे परस्पर मिळून जातात. देवांची चित्तें वीर्यवान् असतात. त्यामुळे ते स्वप्नामध्ये भक्ताच्या मनात प्रवेश करून त्याच्यावर अनुग्रह करितात, हे शास्त्रातरी प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच समाधि, ज्ञान इत्यादिकाच्या अभ्यासाने वीर्यवान् झालेल्या मनाने युक्त असलेले गुरुही शिष्याच्या मनात किवा त्यानी मनाने कल्पिलेल्या जगात प्रवेश करून त्यास बोध करितात. आम्ही जग सर्वसाधारण आहे असे मुळी मानीतच नाही, तर प्रत्येक जीवाचे जग निरनिराळे आहे, असे मानतो. त्यामुळे तुझा दुसरा प्रश्न निरवकाश आहे वासनाराहित्य हीच चित्तशुद्धि आहे. तिच्या योगाने व चिन्मात्रभावनेने साधक ज्ञानी होतो व त्यामुळेच तो मुक्त होतो १७. सर्ग १८-मलीन चित्ताचा मलीन चित्ताशी संबध होतो. आत्मज्ञानाची विवेकादि काही साधनें. श्रीवसिष्ठ-रामभद्रा, शुद्ध मनोराज्याचा परस्पर सबध होतो हे वर सागितले. आता मलिन मनाचा मलिनाशी कसा ससर्ग होतो तें सागतो. सर्व जीवानी आपापल्या कल्पिलेल्या संसारखंडामध्ये स्थूल-सूक्ष्म कलारूप कारणप्रपंच उद्भवतो व त्या कल्पनेमुळेच तो भिन्न भिन्न आहे. पण त्याचा आधार एकच आहे. जागर व स्वप्न या अवस्थात होणारी सर्व जीवाची प्रवृत्ति अथवा निवृत्ति चिदेकरस आत्म्याच्या आसमंतात् व्याप्ती- मळेच होत असते. प्रवृत्ति (म्हणजे व्यवहार ) करणारे जे जे जीव आहेत ते सर्व चिन्मात्र-ज्योतीनेच अर्थजात पहातात. ती ज्योतचि सर्वांचे साक्षिचैतन्य आहे व तें सर्वत्र एक असल्यामुळे जीव ए.मैकाचा कल्पित सर्ग पाहू शकतात. अधिष्ठान अथवा साक्षिचैतन्य याच एका मार्गाने विचित्र सर्गरूपी जलाशय एकमेकांस मिळतात व ते सर्व एक