पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३४ बृहद्योगवासिष्ठसार. ते सत्याचा विचार करण्यास योग्य होते. संकल्पानी ज्याचे आक्रमण केलेले नाही अशा चित्तामध्येच सत्य प्रतिभा उठते. मलिन वस्त्रावर जसा दसरा चागला रंग चढत नाही त्याप्रमाणे अद्वैत-आत्मज्ञान कलुषित चित्तात स्थिर होत नाही. श्रीराम-गुरुवर्य, वासनानुरूप जगभ्रम होतो असे आपण सागित- लेत, पण शुक्राचा तो प्रथम जन्म होता. त्यामुळे त्याला स्वर्ग, अप्सरा, जन्म-मरणपरंपरा इत्यादिकाचा पूर्वी अनुभवच आलेला नव्हता. तेव्हा त्याच्या चित्तात त्याच्याविषयींच्या वासना असणेही संभवत नाही. मग वामनाबीज नसताना त्याचा आरोप कसा शाला ? श्रीवसिष्ठ--रामा, पिता व शास्त्र याच्या उपदेशावरून शुक्राला जशा प्रकारच्या उत्पत्तिविनाशादिशील जगाचा व ऐहिक-पारलौकिक भावाचा बोध झाला होता व आईबापाच्या शोणितशुक्रापासून झालेल्या शरीरातील पंच ज्ञानेद्रियान्या योगाने त्याला जशा प्रकारचे जग प्रत्यक्ष दिसत होते तशाच प्रकारचे सस्कार त्याच्या चित्तात, मोराच्या अंड्यातील मोराप्रमाणे, स्थित होते, व त्यापासून वीजाकुर-न्यायाने स्वर्गादिकाचा आरोप झाला. जीव ज्या वासनेने बद्ध असतो तेच तो आत पहातो. स्वमातील कल्पित स्वशरीराचाच याला दृष्टात आहे व हे जग दीर्घ स्वप्न आहे. ज्या- प्रमाणे सैन्यातील लोक दिवसां आपले सर्व सैन्य पाहून व रात्री त्याच्या वासनेने वासित होऊन निजले असता त्यातील प्रत्येक जण आपापल्या दृष्टीने निरनिराळे सैन्य पहातो पण तं वस्तुतः एकच असते त्याप्रमाणे प्रत्येक जीव आपापल्या वासनेप्रमाणे एकाच जगाला निरनिराळे पहातो. श्रीराम-पण गुरुवर्य, असे मानल्यावर प्रत्येक पुरुष व त्याचा ससार दुसन्याला दिसणार नाही. कारण स्वप्नातील पुरुष व त्याचा संसार दुस- याला दिसत असतो, असा कोटेंहि अनुभव येत नाही. मग गुरु व शिष्य याचा सबंध, उपदेश, शास्त्ररचना इत्यादि कसे होणार ? बरें प्रत्येक पुरुष व त्याचा ससार दुसऱ्याला दिसतो म्हणून ह्मणाचे तर सवाना साधारण असणारा हा संसार एकेकाच्या ज्ञानाने बाधित होणार नाही. मिळून दोन्हीकडून मोक्ष होणे अशक्य. तेव्हां या अडचणींतून कसे पार पडावयाचे, तें सागा.