पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३२ बृहद्योगवासिष्ठसार. वायु याचा संयोग होताच पूर्ण मेघाप्रमाणे पुष्ट झालेला शुक्र श्वासोच्छासासह उठला. त्याने अगोदर पुण्याकति पित्याला वदन केले. तेव्हां पूर्वीप्रमा- णेंच तारुण्य, सौदर्य इत्यादिकाच्या योगाने शोभणाऱ्या पुत्राच्या आकृतीस भगूनेही मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. 'ही तनु मजपासून झाली' या आस्थेस आतल्या आत हंसत असूनही भृगूने आपल्या बालकाच्या सुकुमार तनूस पाहिले. 'हा माझा पुत्र आहे ' या स्नेहाने भगूलाही परवश केले. प्रारब्ध प्राबल्यामुळे यावजीव तसे होणे अगदी अवश्य होते. रात्र सपल्यामुळे भानदित झालेल्या-सूर्य व पद्माकर-याच्याप्रमाणे ते दोघे पिता-पुत्र एकमेकास मुशोभित करूं लागले. असो, काही वेळ आनंदाचा अनुभव घेत त्याच अवस्थेत राहून नतर ते तेथून उठले व समंगानदीवरील ब्राह्मणाच्या शरीरास त्यानी अग्नि दिला. कारण लौकिक आचाराचे उल्लंघन कोण करणार आहे १ नतर आकाशस्थ चद्र-सूर्या- प्रमाणे ते दोघे दीप्त तापसी त्या पावन अरण्यात राहिले. ज्याना विज्ञेय तत्त्व समजले आहे असे ते जीवन्मुक्त जगदगुरू देश-कालानुरूप प्राप्त झालेल्या सुख-दुःग्वदशामध्ये सम (हर्ष-विपादरहित ) व स्वरूपामध्ये सुस्थिर होऊन राहिले. त्यानतर योग्यसमयीं शुक्राला असुराचे गुरुत्व मिळाले. भृगुही आपल्याला योग्य असलेल्या निरुपद्रव प्राजापत्य-अधि- कारावर आरुढ झाला (म. तो प्रजापति झाला.) साराश, हे रामभद्रा, पूर्वसकल्पक्रमानें शुक्र त्या परम पदापासून झाला व वारवार मनात येणा-या अप्सरेविषयींच्या मनोराज्यभ्रमाने पढच्या अनेक दशामध्ये पडला १६. __ सर्ग १७-शुद्ध चित्ताची सत्यसकरपता. शुद्ध मनाने युक्त झालेल्या जीवाचा पर- स्पर संबंध होतो. श्रीराम-भगवन् , भृगुपुत्राची मनोरथम्पी प्रतिभा स्वर्गादिकाच्या अनुभवाने जशी मफळ झाली तशीच दुसन्या लोकाची प्रतिभाही सफळ का होत नाही, किंवा दुसन्या कोणी केलेला मनोरथ सफल का होऊ नये ? श्रीवसिष्ठ-शुक्राचे पूर्व कल्पांतील सर्व दोष त्यातील शेवटच्या जन्मात केलेल्या कर्मानुष्ठानामुळे क्षीण झाले होते. यास्तव या कल्पामध्ये ब्रह्मदेवाच्या संकल्पामुळे भसुरगुरुत्व या अधिकाराचा भोग घेण्याकरिता लची ही प्रथम तनु उत्पन्न झाली. त्यामुळे ती पूर्व संकल्पाच्या