पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. नाश झाल्यामुळे अतःकरण सर्वथैव नाश पावते. थोडक्यात सागावयाचे झाल्यास अत.करणाचा उदय हीच ससाराची उत्पत्ति किवा बध व त्याचा अत्यत नाश ह्मणजेच ससाराचा क्षय किवा मोक्ष होय व अनेक वासना हे त्याचे वीज आहे. हा सिद्धात मी जरी पूर्वीच ठरविला आहे तरी खरे काय आहे, ते आपल्या तोडून ऐकावे अशी माझी इच्छा आहे. अनेक कल्पना करून व्याकुल झालेले हे माझं चित्त स्थिर होईल व मला परम शाति मिळेल, असे करा. हे ऐकून जनक ह्मणाला-मुने, तुला जे समजले आहे तेच तत्त्व आहे, त्यापेक्षा दुसरा काही निश्चय राहिलेला नाही. ते तू स्वतःच जाणले आहेस व गुरूपासूनही त्याचेच श्रवण केले आहेस. पण तोच तुझा निश्चय दृढ होण्याकरिता मीही तुला पुनः सागतों-अखड चतन्यरूप पुरुषावाचून या सृष्टीत दुसरे काहीएक नाही. प्राणी आपल्या सकल्पाने बद्ध झाला आहे व तो आपल्या सकल्पानेच मुक्त होणार आहे. सर्व दृश्य पदार्थाविषयी तू पूर्ण विरक्त झाला आहेस, आणि त्यामुळेच ते दुज्ञेय ज्ञेय तुला आपोआप समजले. तू जरी अल्पवयस्क आहेस तरी या भागरूपी दीर्घ रोगापासून आपली सुटका करून घेतली आहेस. आता यापेक्षा आणखी काय पाहिजे ? तुझा पिता ज्ञानाचा निधि आहे. तो दीर्घ व कष्टकर तपश्चर्यमध्य तत्पर आहे. तरी तुझ्याप्रमाणे त्याला पूर्णता आलेली नाही. पूर्णतेच्या दृष्टीने व्यामापेक्षा मी जरा अधिक आहे. तूं त्याचा पत्र व शिष्य आहेस तरी मजपेक्षाही अधिक आहेस. कारण तुझी भोगेच्छा जितकी क्षीण झालेली आहे तितकी माझी झालेली नाही. प्राप्त करून घेण्यास योग्य असलेले सर्व काही तुला प्राप्त झाले आहे. तुझे चित्त परिपूर्ण झाले आहे. या दृश्य वस्तूमध्ये ते आसक्त होत नाही. आता तू आपली सर्व भ्राति मोड व निभ्रात होऊन मग्वाने रहा. ___ जनकान याप्रमाणे उपदेश केला असता शुक परम वस्तुमध्ये स्थिर होऊन राहिला. त्याचा शोक, सशय, आयास, इच्छा, भय इत्यादि सर्व नाहीसे झाले, व तो महात्मा चित्ताच्या ऐकाग्र्याचा अभ्यास करण्याकरित। मेरूपर्वतावर गेला. निर्विकल्प समाधीने तेथे दीर्घकाल राहून शेवटी ते तत्त्वामध्ये लीन झाला १.