पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग १६. नंद व अविद्यादिशून्य पदाचा अनुभव घे. चित्ताचा वध करण्यास जर तूं समर्थ झालास तर अपरिमित बुद्धिमान् , पूर्ण व परमार्थ सत्य अशा तुज ब्रह्मभूताला सर्व नमस्कार करतील १५. __सर्ग १६-शुक्राला पूर्व शरीरात प्रवेश करावयास सागून काल निघून गेला; शुक्र आपल्या पूर्व तनूत शिरला व दोघेही जीवन्मुक्त होऊन आपापल्या अधिकारावर मारूढ आले. श्रीवसिट-असो, राववा, वर सागितल्याप्रमाणे शुक्र शोक करीत असताना मध्येच त्याच्या वचनास प्रतिबध करून ( असा शोक करणे उचित नव्हे असे सागून) काल ह्मणाला "समंगानदीच्या तीरावरील तापसाच्या या शरीराचा त्याग करून जसा एकादा राजा नगरीत शिरतो साप्रमाणे तूं या आपल्या पूर्व शरीरात शीर. कारण या पूर्वशरीराने तप करून तुला योग्यसमयी असुराचें गुरुत्व सपादन करावयाचे आहे. महाक- स्पान्त झाला ह्मणजे अतिशय म्लान झालेल्या पुष्पाप्रमाणे तूं ही भार्गवी तनु, पुनः ग्रहण न करण्याकरिता (कायमची), सोडशील. पण तोपर्यत हे महामते, या प्राक्तन कर्मामुळे उद्भलेल्या तनूनेंच, जीवन्मुक्तपदास प्राप्त हेऊन, तूं राक्षसेश्वराचा गुरु हो तुमचे दोघाचेही कल्याण असो. आमी आतां इष्टस्थानी ( परप्रेमास्पद आत्मभावावस्थानास ) जातो." राघवा, इतके सागून, ते दोघेही (पिता-पुत्र ) स्नेहामुळे नेत्रातून अश्रू ढाळू लागले असता, तो भगवान् गुप्त झाला. तो गेला असता अवश्य भावि कर्मगति व ईश्वराच्या इच्छेमुळे अनिवार्य झालेली नियति याचा विचार करून, लहानशा सुकुमार लतेमध्ये वसंत जसा प्रवेश करतो त्याप्रमाणे दीर्घ काल व हेमंत-शिशिरादि कालनिमित्तं याच्या योगाने सुकलेल्या आणि पुढे जिच्यापासून शुभ फल प्राप्त होणार आहे अशा तनंत शिरला त्याबरोबर वासुदेव-संज्ञक तापस ब्राह्मण-तनु मूळ तोड- लेल्या वेलीप्रमाणे निस्तेज होऊन भूमीवर पडली. आपल्या पुत्राच्या शरी- रांत जीव आला आहे असे पाहून भृगूने कमंडलूतील जल शिपडून मंत्रांच्या योगाने तिचे आप्यायन (तृप्ति ) केले. त्यामुळे त्या तनूतील सर्व नाड्या वर्षर्तृतील नद्याप्रमाणे भरल्या. पावसाळ्यात जशी नलिनी अथवा वसंत-ऋतूंत वनलता त्याप्रमाणे ती तनु जेव्हां पूर्ण झाली तेव्हा तिचे-नखें केस इत्यादि-प्रांतभागही नव्या पालवीप्रमाणे फुटले. जल व समोरून येणारा