पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३० बृहद्योगवासिष्ठसार. कृत्य केवळ व्यवहारांत होत असते. परमार्थात नाही. कारण व्यवहारांत अज्ञाप्रमाणे दुःखाला दुःख व सुखाला सुख असे जरी ते ह्मणत असले तरी स्वात्मतत्त्वाविषयी सुस्थिर असतात. पण एकाच पुरुषाची एकाच वेळी स्थिर व अस्थिर वृत्ति कशी राहू शकते ह्मणन ह्मणशील तर सांगतो. सूर्याची पाण्यातील प्रतिबिबें जशी चंचल होतात तसे त्याचे आकाशस्थ बिब कांहीं केव्हाही चंचल होत नाही. त्याचप्रमाणे शरीर-उपाधीमुळे ज्ञानी जरी चंचल होत असला तरी तो आपल्या स्वरूपाने कांहीं चंचल होत नसतो. पाण्यातील प्रतिबिंब खाली हालत असतानाही वर सूर्य जसा वर्थ असतो त्याप्रमाणे ज्ञानी व्यवहारात चंचल होत असताना सुद्धा आत स्वस्थ (निश्चल ) असतो. पण असे जर आहे तर अज्ञाप्रमाणेच विहित व निषिद्ध कर्मामुळे त्याला बंधही होईल-असें कदाचित् तू ह्मण- शील पण ते बरोबर नव्हे. कारण बुद्धीद्रियाच्या आसक्तीने केलेली कर्मच प्राण्याला बद्ध करीत असतात. त्याच्या आसक्तीवाचून केलेली कर्मे त्याला कधीही बद्ध करीत नाहीत. लोकातील बंध-मोक्ष व सुखदुःखदृष्टीचे कारण ही ज्ञानेद्रियेच आहेत. यास्तव राघवा. तूंही बाहेर लोकोचित आचार कर व आंतून कटस्थ आत्म्याविषयी दृढ निश्चय ठेव आणि सर्व अव- स्थामध्ये सम, शात व निःस्पृह होऊन रहा सर्व कर्मफलासक्ति सोडून व चित्ताला आत्म्यामध्ये स्थिर करून तूं कर्तव्य कमें कर. कारण कर्मे हा देहस्वभाव आहे. मानस दुःखें, शारीर पीडा, मरण-जन्मादि परिवर्तनें हेच ज्याच्यातील मोठमोठे खड्डे आहेत अशा संसारमार्गातील ममतारूपी खोल विहिरीत पडू नकोस. कारण ती ममताच महा ताप देणारी आहे. (आतां तिच्यामध्ये न पडण्याचा उपाय सागतों तो ऐक. ) कमलनयना, तं देहादि दृश्य वस्तुमध्ये नाहीस व तेही तुझ्यामध्ये नाहीत. तर तूं शुद्ध- बुद्ध-स्वभाव आहेस, असें जागून आतल्या आत अति स्थिर हो. तुं अमल व शुद्ध ब्रह्म आहेस. तच सर्वात्मा व सर्वकर्ता आहेस. यास्तव सर्व विश्व शात व अज आहे अशी भावना करून तूं सुखी हो. दशरथ पुत्रा, ममता-महाधकारातून निघून सर्व इच्छास नाहीसे करणान्या पूर्णा- १ श्रीमद्भगवद्गीतेच्या 'कर्मेन्द्रियाणि संयम्यय आस्ते मनसा स्मरन् । इन्द्रियान्वि मूढात्मा मिथ्याचार स उच्यते ॥ यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारमतेऽर्जुन । कर्म न्द्रियै कर्मयोगमसक्त स विशिष्यते ॥ या श्लोकांत हेच सांगितले आहे.