पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग १५. ५२९ प्राण्याना दुसरे काही कल्याणकर नाही. जे अमनस्कतेस (म. मनःशून्य अवस्थेस) प्राप्त होतात तेच सुखसंभोगाच्या पराकाष्ठेस पोंचतात, तेच महात्मे शांतबुद्धी होत. खरोखर मोठी हर्षाची गोष्ट आहे की, मी सर्व दुःखदशापासून मुक्त झालेल्या, ज्वररहित व मननशून्य अशा या आपल्या तनुस पहात आहे." __ श्रीराम-भगवन्, भृगुपुत्राने वारंवार दुसऱ्याही पुष्कळ शरीराचा अनुभव घेतला होता. मग भगूपासून उत्पन्न झालेल्या याच शरीरावर त्याचे इतके प्रेम का व त्याच्याच करिता तो इतका कष्टी का झाला? श्रीवसिष्ठ-रामा, भृगुपुत्र होण्यापूर्वी शुक्राला में शरीर प्राप्त झाले होते ते सोडताना उत्तर देहाविषयी त्याने जशी भावना केली होती त्याप्रमाणे तो आकाशादि क्रमाने अन्नादिकाच्या द्वारा प्राणापानप्रवाहाने भगच्या शरीरात प्रवेश करून त्याच्या रेतोरूप झाला व चिरकाल अभ्यास केल्या- मुळे दृढ झालेल्या प्राक्तन काम-कर्म-वासनेप्रमाणे मातेच्या उदरात त्याच्या देहास आरंभ झाला. पण त्या देहाने आपल्या सर्व कर्माचा भोग घेतला नव्हता. तर काही थोड्याशा कर्माचा भोग घेऊन बाकीची बरीच कमें अवशिष्ट असतानाच तो त्यातून निघून गेला. ह्मणून त्याचा याच शरीरावर इतका स्नेह राहिला व इतर शरीरातील भोग्य कमें अवशिष्ट राहिलेली नसल्यामुळे त्यावर त्याचा स्नेह राहिला नाही. तो जरी विरक्त, निरभिलाष व समगानदीच्या तीरावरील तापस ब्राह्मणाचे रूप धारण करणारा होता तरी प्रारब्धशेषामुळे त्याने या आपल्या पूर्व तनूकरिता शोक केला. हा देहजन्य स्वभाव आहे. ( साराश ज्ञानी पुरुषालाही प्रारब्धार्चे उल्लंघन करिता येत नाही.) कोणी ज्ञानी असो की, अज्ञानी असो. देह असेपर्यंत हा नियम असाच चालावयाचा. तत्त्वज्ञ व पशुधर्मी अज्ञ असे दोन्ही प्रकारचे लोक लोकव्यवहारामध्ये असेपर्यंत एकसारखेच असतात. पण व्यवहारदशेत जसा अज्ञ तसा पंडित; अशी वस्तुस्थिति जरी असली तरी त्यांच्या वासनामध्ये भेद भसतो व त्या कारणानेंच अज्ञ बद्ध होतात व ज्ञानी मुक्त होतात. ज्यांची बुद्धि सुख-दुःखामध्ये आसक्त होत नाही असे ज्ञानी शरीर असेपर्यंत दुःखाचे निमित्त झाले असतां दुःख होत आहे व सुखनिमित्त झाले असतां सुख होत आहे,असें अज्ञाप्रमाणेच दाखवितात; पण हे त्यांचे अज्ञतुल्य