पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२८ बृहद्योगवासिष्ठसार. चाळणीसारखी छिद्रमय होऊन भूमीवर कशी धूळ खात पडली आहे पहा! ज्या माझ्या या तनूनें हरिचंदनांच्या उद्यानांत दीर्घ काल क्रीडा कली तीच ही आतां शुष्क ककाल होऊन कशी पडली आहे पहा !! अति उच्च कामतरंगानी विह्वल होणाऱ्या चित्तवृत्तीचा लोप झाल्यामुळे आता ही कशी सुकली आहे, पहा !!! अरे माझ्या देहा, काय ही तुझी दर्दशा देवोद्यानादि विविध प्रदेशात व बाल्य-तारुण्यादि विविध दशामध्ये नानाप्र- कारच्या गीत-हास्यादि विलासाचा अनुभव घेऊन आता तूं असा स्वस्थ कां? हे शरीरा, हाय हाय, तुला आता शव हे नाव प्राप्त झाले आहेना ? एकाद्या महातपस्व्याच्या शरीराप्रमाणे तू सुकले आहेस. तुझा अस्थिपंजर मात्र आता अवशिष्ट राहिला आहे. अरे दुर्भाग्या. जे तू मला अति प्रिय होतेस तेच आता भिववीत आहेस. ज्याला मी 'अह' असे म्हणत होतों तेंच तूं अस्थिमय झाले आहेस, म्हणून मी तुला भितो. जेथे पूर्वी नक्षत्र- समूहासारखा उज्ज्वल हार लोळत होता त्याच उरःस्थळावर आता अनेक मुंग्या घर करून राहत आहेत. ज्या सोन्यासारख्या दीप्त कातिमान् आकाराने मी अनेक स्त्रियाना मागे मोहित करीत होतो तोच हा माझा माकार आता कसा ककाल होऊन पडला आहे पहा. ज्याच्यावरील चामडी सडून व कुजून गेली आहे अशा या ोंड वासून पडलेल्या भयंकर कंकालाकडे पाहून या वनातील हरिणादि पशूही भीत आहेत पहा!! याची सुकून गेलेली उदरगर्ता आतून स्पष्ट दिसत आहे. माझी ही शुष्क तनु-पहा, मी ही अशी तुच्छ आहे, कुत्सित आहे, मालिन आहे,' असा तिच्याकडे पहाणारास उपदेश करून सज्ज- नांच्या मनांत जणु काय वैराग्यच उत्पन्न करीत आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इत्यादिकाच्या अभिलाषापासून मुक्त होऊन इतके दिवस माझ्या परोक्ष व आता माझ्या समक्ष ही तनु जणु काय या पर्वता- वर निर्विकल्प समाधीच लावून बसली आहे. चित्तपिशाचाने सोडल्यामुळे जणुं काय ही आता स्वस्थ होऊन राहिली आहे. दैवी विपत्तींना ती भातां मुळीच भीत नाही. चित्त वेताळ शात झाला असतां तनु ज्या भानंद कलेला प्राप्त होते तिचा अनुभव जगाचे राज्य मिळाल्यानेही येणे शक्य नाही. चित्तरूपी मर्कटाच्या वेगानें क्षुब्ध झालेला देहवृक्ष इतक्या वेगान हालू लागतो की, तो मुळापासून उपटून पडतो. तस्मात् मचित्तत्वावाचून